उभं आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीत घालवलं, शरद पवारांमुळे माढ्याचे 6 वेळेस आमदार; पण आता पोरगा भाजपमध्ये जाणार

EX MLA Babanrao Vitthalrao Shinde son Ranjit Shinde likely to join bjp : उभं आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीत घालवलं, शरद पवारांमुळे माढ्याचे 6 वेळेस आमदार; पण आता पोरगा भाजपमध्ये जाणार

Mumbai Tak

मुंबई तक

19 Oct 2025 (अपडेटेड: 19 Oct 2025, 10:00 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उभं आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीत घालवलेल्या बबन शिंदेंचा मुलगा भाजपमध्ये जाणार

point

बबन शिंदें माढ्यातून 6 वेेळेस आमदार म्हणून निवडून आले

EX MLA Babanrao Vitthalrao Shinde son Ranjit Shinde likely to join bjp : सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसले आहेत. कारण सोलापूर जिल्ह्यातील 5 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. दरम्यान, सध्या बबन शिंदे यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांचे चिरंजीव रणजीत शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात आहे. बबन शिंदे यांचं माढ्याच्या राजकारणात मोठं वर्चस्व राहिलं आहे. मात्र, आता त्यांचा संपूर्ण गट भाजपमध्ये जाणार आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : बीड हादरलं! ऐन दिवाळीत तरुणाचा छातीत गोळी लागून मृत्यू, हत्या की आत्महत्या? गुढ कायम

बबन शिंदेंनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस- राष्ट्रवादीत घालवलं, माढ्यातून सहा वेळेस आमदार 

बबनदादा शिंदे माढ्याच्या राजकारणातील मोठं नाव आहे. 1995 ते 2019 असा सलग सहा वेळेस माढ्यातून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. बबन शिंदे शरद पवारांचे विश्वासू सहकारी मानले जायचे. मात्र, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली होती. 30 वर्ष माढ्याचे आमदार म्हणून काम केल्यानंतर 2024 च्या निवडणुकीत त्यांनी मुलाला उभं करण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवारांची साथ सोडल्याने लोक नाराज असतील, असा विचार करुन बबनदादांनी मुलाला अपक्ष उभा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बबन शिंदेंच्या  मुलाला 2024 च्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. अभिजीत पाटील यांनी रणजीत शिंदे यांचा जवळपास 30 हजार मतांनी पराभव केला होता. दरम्यान, आता रणजीत शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. 

बबन शिंदेंचे वडिलही होते माढ्याचे आमदार

बबन शिंदे यांचे वडिल विठ्ठलराव शिंदे कधीकाळी माढ्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. ते देखील काँग्रेसच्या विचारांचे होते. बबन शिंदे यांनी देखील काँग्रेस-राष्ट्रवादीत आयुष्य घालवलं. साखर कारखाना आणि सहकाराच्या जोरावर त्यांची राजकारणात वर्चस्व मिळवलं. पाणीदार नेता म्हणूनही बबन शिंदे यांची माढ्यात ओळख आहे. शिवाय बबन शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांनी 2019 साली करमाळ्यातून अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. त्यापूर्वी संजय शिंदे यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत रणजीत नाईक निंबाळकर यांनी त्यांचा पराभव केला होता.

शिंदे कुटुंबियांना अजित पवारांनी दिली ताकद 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिंदे कुटुंबियांना नेहमीच ताकद दिली. सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील कुटुंबियांचं मोठं वर्चस्व होतं. त्यांच्याविरोधात कुरघोडी करण्यासाठी अजित पवारांनी शिंदे कुटुंबियांना ताकद दिल्याचे देखील बोलले जाते. दरम्यान, माढ्यात शिंदे कुटुंबियांचा पराभव करण्याचा मोहिते पाटील कुटुंबियांचा विचार 2024 च्या निवडणुकीत अभिजीत पाटलांनी पूर्ण करुन दाखवल्याची देखील चर्चा आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या

    follow whatsapp