Sharad Pawar, Baramati : "आजकाल शैक्षणिक संस्थांमध्ये देणगी घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही बाब मला अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची देणगी घेत नाही. विद्या प्रतिष्ठानला देणगी ही संकल्पना पहिल्यापासून नाही. आज सर्व पदाधिकारी अत्यंत बारकाईने संस्थेच्या कामात लक्ष घालतात. वेळ देतात अभ्यास करतात. माझ्या मते हा विद्या प्रतिष्ठानचा ठेवा आहे. त्या सर्वांचा सन्मान मी या ठिकाणी करू इच्छितो. आज जगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर जगात बदल घडत आहे. विविध क्षेत्रात हे बदल घडत आहे. नव्या पिढीसाठी एक उत्तम दालन उभा करून दिले तर ते त्यात यशस्वी होतील. ते दालन इथे लवकरच खुले होईल", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 48 वर्षांपासून फरार आरोपी अखेर मुंबई पोलिसांच्या ताब्यात! आरोपीचा गुन्हा समजला तर हादरूनच जाल...
शरद पवार म्हणाले, ज्यांनी संस्थेसाठी चांगलं काम केलं त्यांचा समान करण्यासाठी हा सोहळा आहे. 1971 ला आम्ही लोकांनी विचार केला इथे काही तरी नवीन करायचे. मी नुकताच महाराष्ट्र विधानसभेला निवडून गेलो होतो. राज्याच्या मंत्रिमंडळात मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. लोकांच्या अपेक्षा अधिक होत्या. त्यावेळचे अनेक सहकारी आम्ही एकत्र होतो. इथे नवीन संस्था स्थापन करून शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन दालन निर्माण करता येईल यासाठी जागेचा प्रश्न होता. बी जी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले ते नुकतेच निवृत्त झाले होते. त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी विद्या प्रतिष्ठान हे नाव सुचवलं आम्ही ते मान्य केलं. जागेसाठी आम्ही लोकांशी बोलत होतो. मग ही जागा आम्ही निवडली. पण एक शाळा काढायची भूमिका माझ्या मनात नव्हती. तर पुढील 50 वर्षे ज्या मागण्या येतील त्याची पूर्तता झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला. 170 एकर जागा आम्हाला इथे मिळाली. एकाच माळरानावर अनेक प्रकारच्या शिक्षणाची दालनं इथे उघडली गेली. या संस्थेची वाढ झाली. आज तुमच्या पाठिंब्याने महाराष्ट्रातील एक उत्तम प्रकारचे संकुल इथे उभे राहिले आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम, गुजराल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी भेट दिली. माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील अशी अनेक नावे सांगता येतील. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एक उत्तम प्रकारचे सभागृह इथे निर्माण केले. याला माझे नाव द्यायचे असा मुद्दा पुढे आला मी त्याला नकार दिला. नंतर ग दि माडगूळकर यांचे नाव देण्याचा निर्णय झाला. यातून शिकून हजारो विद्यार्थी बाहेर पडले. आज केंद्रात अधिकारी भेटतात आणि हळूच सांगतात मी विद्या प्रतिष्ठानचा माजी विद्यार्थी आहे. मी अमेरिकेत जातो तेव्हा मला पाच दहा तरी लोक भेटतात आणि ते सांगत असतात की आम्ही विद्या प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी आहोत. यामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा कशी वाढेल याची काळजी घ्यायची आहे. यातून आपल्याला वेगळं समाधान मिळेल. सातारा पुणे अन्य ठिकाणी सुध्दा आपल्या कामाचा विस्तार वाढला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सुनेचा मृतदेह पाहाताच मोठा धक्का बसला, सासूनेही जागेवर जीव सोडला, संपूर्ण गाव हळहळलं
ADVERTISEMENT
