धाराशिव : शहरातील 140 कोटींच्या विकासकामांवरुन राजकीय संघर्ष उफाळला आहे. निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने आणि कामे सुरू न झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला. आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आक्रमक आंदोलनात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय.
ADVERTISEMENT
"नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही, काळे झेंडे दाखवू"
"डॅशिंग पालकमंत्री म्हणून तुमची निवड झाली आहे, पण शब्द पाळा. नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही, काळे झेंडे दाखवू. साहेब, तुम्ही जिल्ह्याची वाट लावत आहात, जनतेला न्याय पाहिजे आहे", असं म्हणत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यासमोर संताप व्यक्त केला. यावर सरनाईक यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेवटी सरनाईक चिडून गाडीत बसले आणि जाताना उपरोधाने म्हणाले की, तुमच्या नेत्यांनाही सांगा, आपापसात भांडणे कमी करा म्हणजे माझ्या डोक्याचा ताप कमी होईल.
हेही वाचा : Personal Finance: दिवाळीत सोने खरेदीचा विचार? पण तुम्हाला घरात फक्त 'एवढंच' सोनं ठेवण्याची मर्यादा, पण...
दरम्यान, धाराशिव शहरातील विविध विकास कामांसाठी 140 कोटींची निविदा काढण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडीने या निविदेविरोधात पाच दिवस उपोषण केले होते. त्या वेळी पालकमंत्री सरनाईक यांनी अंदाजपत्रकीय दराने निविदा करण्याचे किंवा फेरनिविदा काढण्याचे आश्वासन दिले होते. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी पुन्हा आश्वासन दिले होते की कामे आठ दिवसांत सुरू होतील. मात्र ऑक्टोबरपर्यंतही कामांची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने सरनाईक यांना तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार? असा थेट जाब विचारला.
"राणा पाटील आणि प्रताप सरनाईक यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळेच कामे थांबली"
कैलास पाटील म्हणाले, 140 कोटींच्या भांडणात आम्ही कोठेच नाही, आमचं फक्त म्हणणं आहे की, कामे लवकर सुरू व्हावीत. नगरविकास विभाग विरोधकांच्या सांगण्यावरून दोन इतिवृत्त तयार करतो का? यात कोणाचा हस्तक्षेप आहे? याची चौकशी झाली पाहिजे. मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट घ्या म्हणजे भांडण कोणात आहे? ते समोर येईल. प्रत्यक्षात राणा पाटील आणि प्रताप सरनाईक यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळेच कामे थांबली आहेत.
दरम्यान, पालकमंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना स्थगिती देऊन फेरनिविदा काढण्याचे लेखी आदेश दिले आहेत. सरनाईक म्हणाले की, जर नवीन निविदा काढली आणि स्पर्धा झाली तर नगरपरिषदेचा 30 ते 40 कोटी रुपयांचा फायदा होईल. जादा दर कायम ठेवल्यास तितकंच नुकसान होणार आहे. या सर्व प्रकरणामुळे धाराशिव शहरातील 140 कोटींची कामे पुन्हा राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकली असून, नागरिक मात्र अजूनही खड्ड्यांमध्ये अडकले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
स्मशानात गेला अन् जीव गमावला! अंत्यविधी सुरू असताना भरधाव पिकअप घुसला, एका क्षणात...
ADVERTISEMENT
