Maharashtra Budget 2026 : 'त्या' शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Maharashtra Budget 2026 :  "राज्यातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर योजना मी आज जाहीर करत आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देणार", अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. 

Maharashtra Budget 2026

Maharashtra Budget 2026

मुंबई तक

06 Mar 2026 (अपडेटेड: 06 Mar 2026, 03:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Maharashtra Budget 2026 : 'त्या" शेतकऱ्यांचं 2 लाखांचं कर्ज माफ होणार

point

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Maharashtra Budget 2026 : "आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.  राज्यातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर योजना मी आज जाहीर करत आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देणार", अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. 

हे वाचलं का?

शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्याचा सरकारचा उद्देश - फडणवीस 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कोकणातील लोकांना हे महत्त्वाचं आहे. कारण कोकणातील लोक कर्ज फेडतात. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्याचा सरकारचा उद्देश आहे. यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेता येईल. 

हेही वाचा : अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग आणि पैशांची मागणी! महिला शेतकरी नेत्याच्या हत्येने खळबळ, नेमकं काय घडलं?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबवण्यात येत आहेत. सन 2026-27 मध्ये अनुसुचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 23 हजार 150 कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे. माननिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील अनुसुचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी प्रारुप आराखडा करण्याच्या दृष्टीने समिती गठित करण्यात आली आहे, असंही फडणवीसांनी नमूद केलं. 

आजचा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्षे पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. सामाजिक समरसता वर्ष म्हणुन साजरा केला जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच काम पुर्ण झालं आहे. तर राज्यात काही योजना सुरु केल्या जातील, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Budget 2026 Live Updates : बजेटमध्ये 'लाडकी बहीण' योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा...

    follow whatsapp