निवडणूक आयोगाची वेबसाईट कोणीतरी बाहेरचा माणूस हाताळतो, जयंत पाटलांचा गंभीर आरोप

Jayant Patil : निवडणूक आयोगाची वेबसाईट कोणीतरी बाहेरचा माणूस हाताळतो, जयंत पाटलांचा गंभीर आरोप

Mumbai Tak

मुंबई तक

15 Oct 2025 (अपडेटेड: 15 Oct 2025, 02:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

निवडणूक आयोगाची वेबसाईट कोणीतरी बाहेरचा माणूस हाताळतो

point

याद्या सुधारण्यासाठी आणखी 6 महिने गेले तर काय फरक पडतो? राज ठाकरेंचा सवाल

Jayant Patil, Mumbai : निवडणूक आयोगाची वेबसाईट कोणतरी बाहेरचा माणूस हँडल करत आहे. सकाळी मतदाराचे नाव असते आणि बातम्यांमध्ये ते नाव आले तर ते संध्याकाळी डिलीट कसं होतं? असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज (दि.15) पुन्हा महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे ह्यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील निवडणूक याद्या आणि प्रक्रीयेत असलेल्या घोळाबाबत आक्षेप मांडले. दरम्यान, त्यानंतर निवडणूक आयोगाला भेटलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

हे वाचलं का?

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांसमोर आत्मसमर्पण करणारा नक्षलवादी कोण आहे? सरकारने ठेवलेलं 10 कोटींचं बक्षीस

निवडणूक आयोगाची वेबसाईट कोण तरी वेगळा माणूस हँडल करतोय : जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला काही पुरावे दाखवले. त्यांना पत्रही दिलेलं आहे. पत्र देत असताना मतदार यादीत मतदारयादीत लोकांचे पत्ते चुकीचे आहेत. मी त्याची काही उदाहरणं त्यांना दिली आहेत. कामठी, बडनेरा या मतदारसंघातील दुबार मतदारांची उदाहरणे दिली आहेत. राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हाती काहीच नाही. बाहेरुन कोणीतरी सिस्टिम हाताळत आहे. निवडणूक आयोगाची वेबसाईट कोण तरी वेगळा माणूस हँडल करत आहे. सकाळी मतदाराचे नाव असते आणि बातम्यांमध्ये ते नाव आले तर ते संध्याकाळी डिलीट कसं होतं? त्यामुळे मतदारांची नावे गायब होतात. दर तासाला किती महिलांनी आणि किती पुरुषांनी मतदान केले हे सांगण्यात येते. यावेळी तसं झालं नाही. निवडणुकीत पारदर्शकता नव्हती. हेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीत चालू राहिलं तर कठीण आहे. मुदत वाढवून चालणार नाही. मतदार याद्या तपासा. बोगस मतदार काढून टाका. एक आमदार सांगतात 20 हजार बाहेरून मतदार आणल्याने माझा विजय झाला.

राज ठाकरे म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगच्या अधिकाऱ्यांना भेटलो. आता जयंतराव आणि बाळासाहेब बोलले आहेत. मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रासमोर ठेवायची आहे. निवडणूक आयोग केवळ निवडणूक घेतो. परंतु, राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. निवडणूक आयोग जर राजकीय पक्षांना दाखवत नसेल तर मला वाटतं पहिला घोळ इथे आहे. आता मी तुम्हाला 2024 च्या निवडणुका व्हायच्या अगोदरची आणि निवडणुका झाल्यानंतरची यादी दाखवतो. मतदारसंघ 160 कांदीवली पूर्व मतदाराचं नाव आहे. मुलांचं वय 117 वडिलांचं वय 124... आहे. हा 2024 च्या निवडणुकीच्या अगोदरचा घोळ आहे. निवडणुकीनंतर त्यांनी वेबसाईटवर एक यादी जाहीर केली. त्यामध्ये केवळ नाव आहेत. पत्ता वगैरे काही नाही. राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग एकमेकांवर ढकलत आहे. त्यांना आम्ही सांगितलं जोपर्यंत मतदार यादीत सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. 5 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. याद्या सुधारण्यासाठी आणखी 6 महिने गेले तर काय फरक पडतो? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो अन् जीव घेतो, छळ केल्याने मृत्यू झालेल्या 5 जणांबाबत आंबेडकरांची पोस्ट

 

 

 

 

    follow whatsapp