Former Congress MLA Bhaurao Patil joins Shiv Sena Eknath Shinde, हिंगोली : काँग्रेसकडून सलग तीन वेळा हिंगोली विधानसभेच नेतृत्व करणारे माजी आमदार भाऊराव पाटील यांनी आज (दि.14) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील एक मोठं नाव शिवसेनेत गेल्याने येत्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिंदेसेनेला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून पक्ष सोडल्याचा आरोप
गेल्या 40 वर्षापासून काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आणि सलग पंधरा वर्ष हिंगोली विधानसभेचे नेतृत्व करणारे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
हेही वाचा : बांबू उद्योग धोरण जाहीर, मुंबई उच्च न्यायालयात 2228 पदांची निर्मिती; राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय
विधानसभा निवडणूक अपक्ष लढली
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण आणि अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीकडून भाऊराव पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी डावलून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला हिंगोली विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विधानसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हापासून भाऊराव पाटील गोरेगावकर हे काँग्रेसमध्ये सक्रिय नसल्याचं दिसून येत होतं..
त्यानंतर भाऊराव पाटील गोरेगावकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेतला आहे..
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो आहे. तर भाऊराव पाटील मोठा चेहरा शिवसेनेत गेल्याने येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला जिल्ह्यात मोठा फायदा होणार असून राजकीय समीकरणं बदलली जाणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नांदेडमधील मजूर तरुणाचा दुबईत मृत्यू, मृतदेह मायदेशी आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न; अखेर...
ADVERTISEMENT
