अनंत तरे कोण होते? ज्यांचं ऐकलं नाही म्हणून उद्धव ठाकरेंना होतोय पश्चाताप

Who was Anant Tare : अनंत तरे यांचं ऐकलं नाही, याचा पश्चाताप होत असल्याची भावना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

12 Oct 2025 (अपडेटेड: 12 Oct 2025, 09:39 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनंत तरे कोण होते? जाणून घेऊयात...

point

अनंत तरे यांचं ऐकलं नाही, याचा पश्चाताप होतोय, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

Who was Anant Tare :  "अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर गळ्याशी आलं की अमित शाहांच्या चरणी हंबरडा फोडून लोटांगण घेणारे लोक दिसले नसते. त्यांचं ऐकलं नाही, याचा पश्चाताप होतोय. एकनाथ शिंदे दगा देतील, असं अनंत तरे यांनी यापूर्वीच सांगितलं होतं", असं ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे दिवंगत अनंत तरे यांचं नाव पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलं आहे. योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी त्यांनी अनंत तरे यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, अनंत तरे कोण होते? याबाबत आपण जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

हेही वाचा : 'पश्चाताप होतोय, तेव्हाच अनंत तरेंचं ऐकलं असतं तर शाहांच्या चरणी लोटांगण घेणारे...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

अनंत तरे कोण होते? जाणून घेऊयात... 

अनंतर तरे यांचा ठाण्याच्या राजकारणात मोठा प्रभाव होता. ठाण्यातील प्रभावशाली नेतृत्व आणि लोकप्रिय नेता अशी त्यांची ओळख होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच त्यांना तीन वेळा ठाण्याच्या महापौरपदाचा मान मिळाला होता. ते अनेक वर्षे शिवसेनेचे उपनेते म्हणून कार्यरत होते आणि विधान परिषदेचे सदस्यही म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कामे केली होती. महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आवाज उठवला आणि अनेक आंदोलने केली. ते अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. कामगार संघटनांमध्येसुद्धा त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक उद्योगसंस्थांमध्ये कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी करार घडवून आणत कामगार चळवळ मजबूत केली.

अनंत तरे यांचं 2021 मध्ये निधन झालं 

अनंत तरे यांचं फेब्रुवारी 2021 मध्ये निधन झालं. त्यावेळी ते 66 वर्षांचे होते. मेंदूतील रक्तस्त्रावामुळे अनंत तरे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवाय करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांची प्रकृती खालावली होती.

“हाच माणूस एक दिवस आपल्याला दगा देईल”, उद्धव ठाकरेंनी सांगितला तो किस्सा

उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अनंत तरे यांच्याबाबत भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, अनंत तरे 2014 मध्ये निवडणुक लढवणार होते. त्या काळात भाजपने अचानक युती तोडली आणि विधानसभा निवडणुकीचे आली. त्या काळातच शिवसेनेला संपवण्याचा कट रचला जात होता. आम्ही ठामपणे उभे राहिलो आणि आमचे उमेदवार पुढे आणले. त्या वेळी तरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दिला होता. अनेकांनी मला सांगितले की अनंत तरे ऐकत नाहीत. तेव्हा लोटांगणवीर माझ्याकडे आले आणि म्हणाले, काहीतरी केले नाही तर ही जागा आपण गमावू. मग मी प्रत्यक्ष जाऊन तरे यांच्याशी बोललो आणि त्यांना समजावून सांगितले की भाजपचे संकट आम्ही दूर करु. मान–प्रतिष्ठेचा विचार नंतर करू. त्यावर अनंत तरे यांनी स्पष्टपणे सांगितले, “हाच माणूस एक दिवस आपल्याला दगा देईल.” अनंत तरे नावाचा तो राजहंस आज आपल्यात असता, तर हे कावळे इतके फडफडले नसते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गौरवनं शिक्षिकेला नेलं मित्राच्या रुमवर, मध्यरात्री नको ते केलं नंतर पाशवी बलात्कार ते पण चौघांकडून!

    follow whatsapp