Ajit Pawar on Sangram Jagtap, पुणे : गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप वादग्रस्त वक्तव्य करण्यात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालंय. संग्राम जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करत दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडून करा, असं आवाहन केलं होतं. एकीकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वसमावेश पक्ष असल्याचं सांगत असताना संग्राम जगताप सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेताना पाहायला मिळाले आहेत. अखेर याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
संग्राम जगताप काय म्हणाले होते?
येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांनी खरेदी करताना फक्त हिंदू व्यापार्यांकडूनच वस्तू घ्याव्यात, असा सल्ला आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे. आपल्या सणाच्या खरेदीतून होणारा नफा हिंदू समाजातील व्यापाऱ्यांनाच मिळावा, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान करत, सध्या हिंदू मंदिरांवर आणि हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदींमधूनच घडत असल्याचा आरोपही केला.
अजित पवारांनी झाप झाप झापलं
अजित पवार म्हणाले, अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत तिथे सर्वकाही सुरळीत होतं. काही लोकांना आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे, हे लक्षात येत नाहीये. आपल्या वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही. त्यामुळे आपण जबाबदारी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. मी तिथे एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हाही त्याला समजून सांगितलं होतं. तो म्हणाला होता, मी यामध्ये सुधारणा करेन. मात्र, तो सुधारणा करताना दिसत नाहीये. त्याचे विचार आणि भूमिका पक्षाला अजिबात मान्य नाही. त्याला कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे.
यापूर्वीही संग्राम जगताप यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
संग्राम जगताप यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील ते सातत्याने मुस्लिम समाजाबाबत द्वेष पसरवणारे वक्तव्य करताना पाहायला मिळाले आहेत. एका सभेत त्यांनी मुस्लिम समाजाला शिवीगाळ देखील केली होती. त्यामुळे अजित पवार संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
