पुणे: "चंद्रकांत पाटलांचा कर्मचारी निलेश घायवळच्या संपर्कात..." धंगेकरांचा आरोप आणि शिवसेना-भाजपातच जुंपली

आता पुण्याच्या कोथरूडमधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं

पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं

मुंबई तक

10 Oct 2025 (अपडेटेड: 10 Oct 2025, 12:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र धंगेकरांचा मंत्री चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप

point

निलेश घायवळ प्रकरणात मोठा ट्विस्ट

point

पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं

Pune Dhangekar on Nilesh Ghaywal: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. आता पुण्याच्या कोथरूडमधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधल्याचं समोर आलं आहे. धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील एक कर्मचारी कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळच्या संपर्कात असून घायवळला पळून जाण्यासाठी सरकारमधील काही नेत्यांनी मदत केली असल्याचा आरोप केला होता. 

हे वाचलं का?

कर्मचाऱ्याचा निलेश घायवळसोबतचा फोटो

धंगेकरांना हे आरोप करताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधील समीर पाटील नावाच्या कर्मचाऱ्याचा निलेश घायवळसोबतचा फोटो सुद्धा दाखवला. या आरोपांमुळे भाजप आक्रमक झाले असून त्यांनी रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची योजना आखल्याचं सांगितलं जात आहे. भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी सुद्धा शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्यावर बोचरी टीका करत धंगेकरांचे आरोप निरर्थक आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगितलं. 

हे ही वाचा: पुण्यात ATS आणि पोलिसांची प्रचंड मोठी कारवाई, 'त्या' 18 जणांचा नेमका काय होता प्लॅन?

धीरज घाटे काय म्हणाले?

धीरज घाटे याविषयी बोलताना म्हणाले की "धंगेकर हे यापूर्वी बऱ्याच पक्षांमध्ये राहिले असून त्यांचा पक्ष आता महायुती आघाडीत भाजपचा भागीदार आहे असल्याचं आता ते विसरले आहेत. त्यांच्या या आरोपामुळे ते फक्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर त्यांनी हे असंच चालू ठेवलं तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रतिसाद देऊ."

हे ही वाचा: प्रेयसी आणि प्रियकर एकत्र लॉजच्या खोलीत बंद... पण, अचानक घडली भयानक घटना अन् मिळाली मोठी शिक्षा!

राजकीय वातावरण पुन्हा तापलं

खरंतर, कोथरूडमधील गुंड निलेश घायवळ हा बनावट कागपत्रांच्या आधारे परदेशी पळून गेल्याचा आरोप आहे. त्याच्यावर हत्या आणि वसूलीसारखे आरोप आहेत. नुकतंच, त्याच्या साथीदारांवर पुण्यातील रोड रेज घटनेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या सगळ्या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.

    follow whatsapp