Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनाने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मातीशी नाळ जोडलेला नेता अशी अजित पवार यांची ओळख आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे. बुधवारी सकाळी 8:45 वाजता त्यांच्या विमानाचा अपघात झाल्याने त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त समोर आले आहे. त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. ते 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले होते, पण त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अधुरं राहिलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अजित पवार यांचे कधीही न पाहिलेले फोटो आले समोर
अजित पवार यांची राजकीय कारकिर्द थोडक्यात
अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला. नंतर 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते निवडून आले होते, हाच त्यांचा राजकारणातील प्रवेश होता.
1992 मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या सांगण्यावरून खासदारकीचा राजीनामा दिला होता, त्याचवर्षी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळवले.
1990 साली त्यांनी कृषी, जलसंधारण, ऊर्जा, नियोजन अशा काही खात्यांचे राज्यमंत्री पद मिळवत काम केलं होतं.
हे ही वाचा : अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार हळहळले, म्हणाले 'कृपया कोणीही राजकारण...'
6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अधुरं
2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपला नावलौकिक मिळवला होता. अजित पवार यांनी नंतर पाटबंधारे, स्वच्छता, आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री म्हणून देखील काम केलं होतं. 1995 ते 2019 या कालावधीत बारामती मतदारसंघातून 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
तसेच त्यांनी 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषविले होते, पण त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अपुरं राहील.
ADVERTISEMENT











