'गरीब मुलाला सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझा देव चोरला...', सूरज चव्हाणला हुंदका आवरेना VIDEO

Ajit Pawar Death : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भावना व्यक्त करताना म्हणाला, अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती.

Ajit Pawar Death

Ajit Pawar Death

मुंबई तक

28 Jan 2026 (अपडेटेड: 28 Jan 2026, 04:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'गरीब मुलाला सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझा देव चोरला...',

point

सूरज चव्हाणला हुंदका आवरेना

Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि.28) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाय. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून अजितदादांच्या जाण्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. दरम्यान, अजितदादांनी ज्याला घर बांधून दिलं त्या सूरज चव्हाण देखील हुंदका आवरत नाहीये. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत अजितदादांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

हे वाचलं का?

सूरज चव्हाण काय म्हणाला? 

सूरज चव्हाण म्हणाला, मित्रांनो माझा देव चोरला आज.... मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजितदादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…अजितदादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय…माझ्या आई आबा नंतर अजितदादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली  तुमचाच सूरज..

हेही वाचा : LIVE Update: अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराबाबत नेमकी माहिती आली समोर! कधी आणि कुठे होणार?

सचिन तेंडुलकरनेही वाहिली श्रद्धांजली 

भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भावना व्यक्त करताना म्हणाला, अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. 🙏🏽

अभिनेता रितेश देशमुख काय म्हणाला? 

विमान अपघातात आपण अजित दादांना गमावल्याचं ऐकून मोठा धक्का बसला आणि खूप दुःख झालं. महाराष्ट्रातील सर्वात गतिमान नेत्यांपैकी एक असलेले, त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या लोकांना सतत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले. त्यांची बुद्धिमत्ता अतुलनीय होती आणि राज्यभरातील लोकांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. त्यांच्या अकाली निधनामुळे एक मोठे नुकसान झालं असून कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधण्याचा आनंद मला मिळाला आहे. पवार कुटुंब, त्यांच्या प्रियजनांना आणि लाखो समर्थकांना माझ्या मनापासून संवेदना.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ajit Pawar Death : दाट धुकं, लो व्हिजिबलिटी आणि... अजितदादांचं विमान कोसळलं तेव्हाची सगळी क्रोनोलॉजी जशीच्या तशी!

    follow whatsapp