Anjali Damania on Rupali Chakankar, मुंबई : "रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबा अशोक खरात याला 177 वेळा कॉल केला होता, तर चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचे अशोक खरातला तब्बल 236 कॉल्स झाले", असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. त्या मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीतील सीडीआर (CDR) काढले असल्याचा दावा करत अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'मित्रांनी प्राध्यापकासोबत अफेअर असल्याच्या अफवा पसरवल्या', डॉक्टर निकिताची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट
सुषमा अंधारे सीडीआर बाबत काय म्हणाल्या?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, रूपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल खरातला झाले आहे तर त्यांची बहीण प्रतिभा ताकड तर यांचे 236 कॉल आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे सतरा कॉल आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहेत. अनेक माहिती या संस्था पुढे येत असतात असतात पण सर्वसामान्य जनतेपुढे पण ती माहिती यायला हवी म्हणून मी हे सर्व काही सांगत आहे. अशा व्यक्तीसोबत एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल झाले आहेत (10 इनकमिंग आणि 7 आऊटगोईंग) तर ते कशा संदर्भात झाले आहेत ते त्यांनी सांगणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी आठ कॉल आहेत. हे सगळे नॉर्मल कॉल आहेत व्हाट्सअप बद्दल माहिती नाही. व्हाट्सअप ची माहिती मिळत नसते. आता समजा पाहायला गेलं तर सर्वाधिक संपर्क कोणासोबत झाला आहे तर तो कुटुंबातील सदस्या होळी सोबत आहे आणि त्यानंतर रूपाली चाकणकर यांच्यासोबत आहे. 33 हजार पेक्षा जास्त सेकंड रूपाली चाकणकर यांच्यासोबत सोबत बोलणं झालं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











