अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ, मोबाईलमधील डेटाचा तपास सुरु

Ashok Kharat : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणाने केवळ राज्यच नाहीतर देश हादरून गेला. महाराष्ट्रभर अशोक खरातच्या करारनाम्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच अशोक खरातच्या पोलीस कोठडीची तारीख वाढवण्याच आली आहे.

Ashok Kharat

Ashok Kharat

मुंबई तक

29 Mar 2026 (अपडेटेड: 29 Mar 2026, 02:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

point

अशोक खरातच्या करारनाम्यामुळे महाराष्ट्र हादरला

Ashok Kharat : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणाने केवळ राज्यच नाहीतर देश हादरून गेला. महाराष्ट्रभर अशोक खरातच्या करारनाम्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता नाशिक जिल्हा न्यायालयाने आज 29 मार्च 2026 रोजी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशातच आरोपी अशोक खरात भोंदूबाबाच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिल 2026 पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच आर्थिक फसवणुकीचे असंख्य गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी आता एसआयटीसाठी अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पत्नीचा मर्डर केल्याने वडील तुरुंगात; ज्याच्याकडे आश्रयासाठी गेली त्या मामानेच केला भाचीवर बलात्कार

कडक पोलीस बंदोबस्तात अशोक खरातला न्यूयमूर्ती श्रीमती एम.व्ही. भराडे यांच्या न्यायालयात सकाळी 11.30 वाजता हजर केले. एसआयटी तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. 

अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

अशातच अशोक खरातवर आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी 8 गुन्हे हे महिलांवरील असून 2 गुन्हे हे फसवणुकीचे असल्याची माहिती आहे. संबंधित प्रकरणात एसआयटी न्यायालयाने सांगितलं की, या प्रकरणात अशोक खरात या भोंदूबाबाविरोधात अनेक पीडित महिला तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येऊ लागल्यात आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अशोक खरातच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : Amit Shah Aaj Tak Exclusive: ‘लॉकडाऊनचा प्रश्नच नाही.. गॅस, पेट्रोलचा आपल्याकडे पुरेसा साठा’

दरम्यान, त्याचा मोबाईल रिकव्हर करणे आणि त्याच्या मालमत्तेचा शोध घेणं अद्याप बाकी आहे. फॉरेन्सिक पथकाकडून डेटा मिळवण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणात खरात आणखी कोणाचे नाव घेतील, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.