मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशोक खरातकडून अघोरी पूजा करुन घेतली; बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Harshwardhan Sapkal on Chandrakant Patil : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत.

Harshwardhan Sapkal on Chandrakant Patil

Harshwardhan Sapkal on Chandrakant Patil

मुंबई तक

• 03:03 PM • 25 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

"मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशोक खरातकडून अघोरी पूजा करुन घेतली"

point

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Harshwardhan Sapkal on Chandrakant Patil : "मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे", असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. सपकाळ यांनी X या सोशल मीडियावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांच्या सरकारवर देखील सनसनाटी आरोप केले आहेत. ते नेमकं काय काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट जशेच्या तसे 

सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील. अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. 

हेही वाचा : फडणवीस सरकारनेही अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला दिला होता निधी; किती कोटी मोजले? 2018 चा शासन निर्णय

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे. भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहका-यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरु केली..भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्र पक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सौंदर्याची भूरळ पाडून 150 जणांचं आयुष्य उद्धवस्त केलं, तुरुंगात करते योगा अन् डान्स, बॉयफ्रेंड बंटीलाही अटक