नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ, तृतीयपंथी व्यक्तीसोबतच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे खळबळ

Narhari Zirwal Viral Video : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा हा व्हिडिओ असून तो शासकीय निवासस्थानातील असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी काँग्रसने झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Narhari Zirwal Viral Video

Narhari Zirwal Viral Video

मुंबई तक

• 09:45 AM • 26 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ

point

तृतीयपंथी व्यक्तीसोबतच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे खळबळ

Narhari Zirwal Viral Video : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा हा व्हिडिओ असून तो शासकीय निवासस्थानातील असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी काँग्रसने झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याआधी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाच्या लाच प्रकरणी अडचणीत सापडलेले झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. 

हे वाचलं का?

काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये मंत्री झिरवाळ हे एका तृतीयपंथी (ट्रान्सवुमन) व्यक्तीसोबत बेडवर असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांच्याशेजारी काही खाद्य पदार्थ आणि मद्य असल्याचे दिसत आहे. या दोघांसोबत अजून एक कर्मचारी त्याठिकाणी वावरत असल्याचे दिसत आहे.  

हे ही वाचा : धडकी भरवणारा 'एनर्जी लॉकडाउन' भारतात होणार लागू? काय खरं काय खोटं.. नेमकं घ्या समजून!

कोण आहे पवन यादव?

या व्हिडिओत दिसणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीचे नाव पवन यादव असे आहे. त्याचा भाऊ रवी यादव याने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाला वाचा फोडली. पवन यादव हा तृतीयपंथी (ट्रान्सवुमन) व्यक्ती खंडणी गोळा करण्याचं काम करतो अशी माहिती आहे. तसेच खंडणीप्रकरणी त्याच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, अशी माहिती पवनचा भाऊ रवी यादव याने दिली आहे. 

हे ही वाचा : Personal Finance: वयाच्या 40व्या वर्षी मिळवा 3 कोटी रुपये, SIP लय भारी!

मंत्रीपदावरुन हकालपट्टी करा

या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांची मंत्रीपदावरुन तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे, असं सपकाळ म्हणाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.