Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा थेट संपर्क असल्याचे उघड झालंय. ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आणि पक्षातील सर्व पदांवरून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केली आहे. त्या नाशिक येथे बोलत होत्या. शिवाय, यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सूनेत्रा पवार यांना एक पत्र देखील लिहिलंय. शिवाय, नाशकातील प्रत्येक तालुक्याच्या तालुकाध्यक्षांनी प्रेरणा बलकवडे याच्याकडे चाकणकरांना हटवण्याची मागणी केल्याचंही सांगितलंय.
ADVERTISEMENT
हेही वाचा : लुडो खेळताना दीराने चिमटा काढला, वहिनी थेट रागीट असलेल्या पतीला फोन करणार...इतक्यात भयंकर घडलं
प्रेरणा बलकवडे यांचे पत्र जसेच्या तसे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा सन्मान आणि न्यायासाठी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. याच मूल्यांवर विश्वास ठेवून आम्ही, नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या, पक्षाचे काम निष्ठेने करत आहोत. परंतु, आज पक्षाच्या अस्तित्वावर आणि तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, आणि त्याच तीव्र वेदनेतून आम्ही हे आवाहन करत आहोत.
डॉ. अशोक खरात यांच्याकडून अनेक महिला आणि तरुण मुलींचा छळ झाल्याच्या भयानक प्रकरणात पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष, सौ. रूपाली चाकणकर यांचा थेट संपर्क असल्याचे उघड झाले आहे. ही अत्यंत लज्जास्पद वाव आहे की, अनेक वर्षांपासून महिलांचा छळ करणाऱ्या व्यक्तीचे त्या समर्थन करत आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात पक्षाच्या प्रतिमेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
ही त्यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी श्री. हगवणे प्रकरण व इतर प्रकरणात देखील त्यांचा निष्काळजी कार्यामुळे पक्षाचे नाव खराब झाले आहे. त्यावेळी आदरणीय अजित दादा पवार यांनी त्यांचावर कारवाई करायची व निवडणुकीनंतर महिला प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा त्यांनी अनेक वेळी केली होती. पक्षाला प्रत्येकवेळी या संवेदनशील प्रकरणांची माहिती असूनही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई कधी झाली नाही आणि त्याच दुर्लक्षामुळे आज पक्षावर ही गंभीर वेळ ओढवली आहे.
आज पक्षाची प्रतिमा समाजात डागाळली आहे. आपल्या महिला प्रदेशाध्यक्षांचे नाव प्रकरणात जोडल्याने व महिलांचा छळ करणाऱ्यांचे समर्थन करतात, त्या महिला नेतृत्वाखाली आम्ही तळागाळातील महिला कार्यकर्त्या काम करू शकत नाही. आज ग्रामीण भागात आम्ही महिला त्यांचासोबत काम केले तर लोकांमध्ये आमच्याविषयी चुकिची छवी निर्माण होईल. लोकांमध्ये जाऊन पक्षाच्या तत्त्वांविषयी बोलणे आम्हाला अशक्य होणार आहे. त्यामुळे, आम्ही, नाशिक जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी सदस्य, तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते, आपणास एकमताने आणि अत्यंत गंभीरपणे हे कळवत आहोत की, जर सौ. रूपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवले नाही, तर आम्ही सर्व जण निष्ठेने आमची कर्तव्ये पार पाडू शकणार नाही.
महाराष्ट्रातील जनतेमध्ये पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि पक्षाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी, आम्ही आपणास विनंती करत आहोत की, सौ. रूपाली चाकणकर यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आणि इतर सर्व पदांवरून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. आपण यावर त्वरित कारवाई करून पक्षाची होणारी अपरिमित हानी टाळाल, हीच शेवटची आशा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
लुडो खेळताना दीराने चिमटा काढला, वहिनी थेट रागीट असलेल्या पतीला फोन करणार...इतक्यात भयंकर घडलं
ADVERTISEMENT











