मुंबईसह ठाणे लोकसभेची श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी, लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांची यादी समोर

shrikant shinde : लोकसभा निवडणुकीची शिवसेनेनं आतापासून कंबर कसली आहे. अशातच मुंबईसह ठाण्याची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली.

shrikant shinde

shrikant shinde

मुंबई तक

31 Mar 2026 (अपडेटेड: 31 Mar 2026, 04:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

श्रीकांत शिंदे यांच्यासह 'या' नेत्यांवर खासदारकीची जबाबदारी

point

लोकसभा मतदारसंघ निहाय संपर्कप्रमुखांची नावे समोर

Shrikant Shinde : शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली. यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आतापासून कंबर कसल्याचं चित्र आहे. अशातच मुंबईसह ठाण्याचे संपर्कप्रमुख म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे. अशातच 48 लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे, त्यांच्या नावांची यादी समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 8 वीत शिकणाऱ्या मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री, शाळेतून हॉटेलवर नेलं, दुसऱ्याच मुलीचं ओळखपत्र दाखवून लैंगिक शोषण

श्रीकांत शिंदे यांच्यासह 'या' नेत्यांवर खासदारकीची जबाबदारी

राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने संपर्कप्रमुखांची घोषणा केल्याचे वृत्त आहे. उत्तर मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई हे सहा लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली. श्रीकांत शिंदेंसह आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे, मंत्री योगेश कदम यांच्यावर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. अशातच आता लोकसभा मतदारसंघ निहाय संपर्कप्रमुखांची नावे समोर आली आहेत. 

लोकसभा मतदारसंघ निहाय संपर्कप्रमुखांची नावे

मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
2) ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

3) भिवंडी व कल्याण – 
खासदार नरेश म्हस्के 

4) नंदुरबार -
 माजी आमदार शिरीष चौधरी 

5) धुळे व दिंडोरी - 
शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी 

6) जळगाव - 
आमदार दिलीप लांडे 

7) रावेर - 
आमदार तुकाराम काते 

8) बुलढाणा - 
संजय सोनार 

9) अकोला - 
माजी आमदार राजन साळवी 

10) अमरावती - 
आमदार किशोर अप्पा पाटील 

11) वर्धा - 
आमदार डॉ. मनीषा कायंदे 

12) रामटेक -
 अनिल कोकीळ 

13) नागपूर - 
माजी खासदार संजय निरुपम 

14) भंडारा-गोंदिया - 
विलास चावरी 

15) गडचिरोली- चिमूर - 
माजी मंत्री जगदीश गुप्ता 

16) चंद्रपूर - 
आमदार कृपाल तुमाने 

17) यवतमाळ - वाशिम - 
शिवसेना उपनेत्या प्रिती बंड 
18) हिंगोली - 
शिवसेना उपनेते आनंदराव जाधव 

19) नांदेड - 
दत्ता दळवी 

20) परभणी - 
भास्कर आंबेकर 

21) जालना – 
खासदार संदिपान भुमरे 

22) छत्रपती संभाजी नगर -

विलास पारकर 

23) नाशिक –

आमदार सुहास कांदे 

24) पालघर – 
पांडुरंग पाटील

25) रायगड - 
अनिल नवघरे 

26) कोल्हापूर, मावळ व पुणे लोकसभा - 
मंत्री उदय सामंत 

27) बारामती –
 किरण लांडगे 

28) शिरुर – 
आमदार शरद सोनवणे 

29) अहिल्यानगर – 
शिवसेना सचिव राम रेपाळे

30) शिर्डी – 
खासदार डॉ. ज्योती वाघमारे 

31) बीड – 
मनोज शिंदे 

32) धाराशिव – 
माजी खासदार उन्मेष पाटील 

33) लातूर – 
मंगेश कुडाळकर 

34) सोलापूर – 
खासदार धैर्यशील माने 

35) माढा – 
चंद्रहार पाटील 

36) सांगली – 
योगेश जानकर

37) सातारा – 
शरद कणसे
 
38) रत्नागिरी – 
राजेश मोरे, नगरसेवक
 
39) सिंधूदुर्ग – 
बाळा चिंदरकर 

40) हातकणंगले – 
आमदार सुहास बाबर