'माझ्या वयापेक्षा लहान...', अजित पवारांच्या निधनाने सुमित्रा महाजन प्रचंड हेलावल्या, बोलून दाखवली 'ती' गोष्ट

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात निधन झालं. ही दुर्दैवी घटना 28 जानेवारी रोजी सकाळी घडल्याचे वृत्त आहे. राज्यभरात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अशातच लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हळहळ व्यक्त केली.

 Ajit pawar

Ajit pawar

मुंबई तक

28 Jan 2026 (अपडेटेड: 28 Jan 2026, 02:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांच्या जाण्याने सुमित्रा महाजन यांना अश्रू अनावर 

point

'माझ्या वयापेक्षा लहान माणसांना काय श्रद्धांजली अर्पण करणार..'

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात निधन झालं. ही दुर्दैवी घटना 28 जानेवारी रोजी सकाळी घडल्याचे वृत्त आहे. राज्यभरात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अशातच लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हळहळ व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, आपल्याहून कमी वयाच्या लोकांना आपण काय श्रद्धांजली वाहणार, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ajit Pawar Death : 'त्या' एका वस्तूमुळे अजितदादांची बॉडी ओळखता आली, न पाहावणारी दृश्य

सुमित्रा महाजन यांना अश्रू अनावर 

समजत नाही हे कसं झालं का झालं? अशा घटना देशासाठी, प्रदेशासाठी अगदी दुर्दैवाचं आहे. अशा उभारी घेणाऱ्या नेत्यासोबत असं घडलंय. त्यांनी कधी कोणी कोणाला काहीही वाईट वक्तव्य केलं नव्हतं. त्यांनी आपल्या पक्षासोबत सामंजस्याने काही गोष्टी घेतल्या.  मराठीत एक म्हण आहे की, चालत्या गाडीला खिळ लागणं तसाच दिवस आहे. 

हे ही वाचा : Ajit Pawar Death: अजितदादांचं विमान क्रॅश होताच बनलं फायर बॉल, Crash Site चे अत्यंत भयंकर Photos

'माझ्या वयापेक्षा लहान माणसांना काय श्रद्धांजली अर्पण करणार..'

तिन्ही पक्षाचे नेते राज्य चालवत होते, तिघांमधील सामंजस्य ठेवून काम करत होते. आता बाकीच्या गोष्टी या राजकारणात होतच राहतात. त्यांचा आपले काका शरद पवार यांच्या प्रती मोठा आदर होता, अशा नेत्यांची गरज आहेच. मी त्यांना कधीही बघितलं नाही, पण त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि काम करताना सर्वांना सोबत घेऊन काम करणं अशा लोकांचं जाणं ही दु:खद घटना आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मी माझ्या या वयात माझ्या वयापेक्षा लहान माणसांना काय श्रद्धांजली अर्पण करणार, असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. 

    follow whatsapp