Pawar Family : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. यामुळे सगळ्या राज्यावर शोककळा पसरील आहे. राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब हे केंद्रस्थानी राहिले आहे. शरद पवार यांच्यामुळे पवार घराण्याचा नावलौकिक सर्वत्र पसरला. शरद पवारांनंतर पवार घराण्यातील दबदबा असणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती. कसा होता पवार घराण्याचा राजकारणातील प्रवास, जाणून घेऊया..
ADVERTISEMENT
पवार कुटुंबाच्या राजकारणातील दुसऱ्या पिढीचा चेहरा हरपला!पवार कुटुंब मुळचे सातारा जिल्ह्याचे होते, पण नंतर ते बारामतीमध्ये येऊन स्थायिक झाले. पवार कुटुंबाला 'शेतकरी कामगार पक्षा'चा वारसा लाभलेला होता. शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार हे स्थानिक शेतकरी संघाचे अध्यक्ष होते, तर त्यांची आई शारदाबाई पवार या लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या.
गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांना 11 अपत्ये होती. त्यांची सात मुले - वसंतराव, अप्पासाहेब, अनंतराव, शरद, बापूसाहेब, सूर्यकांतराव आणि प्रतापराव; तर चार मुली - सरला, सरोज, मीना आणि लीला अशी त्यांची नावे आहेत.
सर्वात मोठे बंधू वसंतराव पवार वकील होते. अप्पासाहेबांनी कृषी विषयाचे शिक्षण घेतले होते. अनंतरावही शेतीशी संबंधित होते. बापूसाहेब इंजिनिअर बनले. सूर्यकांत यांनी बडोद्यातून शिक्षण पूर्ण केले आणि ते आर्किटेक्ट झाले. प्रतापराव पवार यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला. शिक्षणादरम्यानच ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. 1958 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले. 1962 मध्ये पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 1967 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि वयाच्या 27 व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले.
हे ही वाचा : माझा मोठा भाऊ हरपला, आमच्या सहकाऱ्याचा जीव गेलाय, अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे; एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर
शरद पवार सार्वजनिक जीवन जगत असले तरी त्यांच्या कुटुंबातील फार कमी लोकांची माहिती सार्वजनिक आहे. असे म्हटले जाते की, शरद पवार यांचे थोरले बंधू अप्पासाहेब यांचे पुत्र राजेंद्र यांना राजकारणात यायचे होते, परंतु कुटुंबातील एक सदस्य अजित पवार आधीच राजकारणात आले होते, त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. अप्पासाहेबांचे दुसरे पुत्र रणजित आहेत.
अनंतराव पवार यांनाही श्रीनिवास आणि अजित अशी दोन मुले झाली. श्रीनिवास राजकारणात आले नाहीत, पण अजित यांनी यात पाऊल ठेवले. 22 जुलै 1959 रोजी अजित पवार यांचा जन्म नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली गावात झाला होता. अजित पवार 90 च्या दशकापासून राजकारणात आहेत. ते पाच वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले. शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे सर्वात मोठे दावेदार मानले जात होते.
शरद पवार यांनी माजी कसोटी क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांची कन्या प्रतिभा यांच्याशी विवाह केला. प्रतिभा पवार राजकारणापासून दूर होत्या, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा चांगलाच प्रभाव होता. शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे की, 2019 मध्ये जेव्हा अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, तेव्हा प्रतिभा यांच्या सांगण्यावरूनच ते पक्षात परतले होते. शरद पवार लिहितात की, प्रतिभा यांना भेटल्यानंतर अजित यांनी माफी मागितली होती आणि भाजपचा पाठिंबा काढून घेण्यास ते तयार झाले होते.
हे ही वाचा : "असा नेता होणे नाही..." अजित दादांच्या निधनानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भावूक प्रतिक्रिया
शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे राजकारणात खूप सक्रिय आहेत. सुप्रिया सुळे 2006 मध्ये राज्यसभा खासदार झाल्या होत्या. तीन वर्षे राज्यसभेत राहिल्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवली. 2009 नंतर 2014 आणि 2019 मध्येही सुप्रिया बारामतीतून लोकसभा खासदार राहिल्या आहेत. याच वर्षी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुप्रिया यांचा सदानंद बालचंद्र सुळे यांच्याशी विवाह झाला. त्यांना विजय हा मुलगा आणि रेवती ही मुलगी आहे.
शरद पवार यांच्या कुटुंबातील तिसरी पिढीही राजकारणात आली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 मध्ये पार्थ यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, पार्थ ही निवडणूक हरले होते.
2019 मध्ये शरद पवार यांनी जेव्हा पार्थ यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते, तेव्हा कुटुंबात वाद समोर आला होता. हा वाद पार्थ आणि रोहित यांच्यात होता. रोहित हे अप्पासाहेबांचे नातू आणि राजेंद्र यांचे पुत्र आहेत. त्यावेळी रोहित यांनी फेसबुकवर लिहिले होते की, 'पवार साहेबांच्या (शरद पवार) निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, पण त्यापेक्षाही मोठे प्रेम असते, त्यामुळे त्यांनी आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा.'
ADVERTISEMENT











