मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ 35 KM च्या मेट्रो लाईनला मान्यता; किती स्टेशन? देवेंद्र फडणवीसांनी प्लॅन सांगितला

Mumbai Airport to Navi Mumbai Airport 35 KM metro line : मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ या संपूर्ण अंतराला जोडणारी मेट्रो लाईन पुढील पाच वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचा इरादा देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलाय. शिवाय, या संपूर्ण प्रकल्पाची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी नेमकं काय काय सांगितलं? सविस्तर जाणून घेऊयात.. 

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

मुंबई तक

27 Jan 2026 (अपडेटेड: 27 Jan 2026, 04:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ 35 KM च्या मेट्रो लाईनला मान्यता

point

किती स्टेशन? देवेंद्र फडणवीसांनी प्लॅन सांगितला

Mumbai Airport to Navi Mumbai Airport 35 KM metro line : मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महसूल विभाग आणि शासकीय जमीनीच्या भाडे पट्टे कालावधी यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय CMO ने ट्वीटरवरुन शेअर केले होते. मात्र, बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठ्या प्रकल्पाला मान्यता दिल्याचं सांगितलंय. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ या संपूर्ण अंतराला जोडणारी मेट्रो लाईन पुढील साडेतीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचा इरादा देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलाय. शिवाय, या संपूर्ण प्रकल्पाची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी नेमकं काय काय सांगितलं? सविस्तर जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

हेही वाचा : महालक्ष्मी अन् तुळजाभवानीचं दर्शन घेऊन विठुरायाच्या दर्शनाला निघाले, पण वाटेत काळाचा घाला; चौघांचा मृत्यू

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो कशी असेल? देवेंद्र फडणवीसांनी प्लॅन सांगितला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यानच्या 35 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाला मंत्रिमंडळ पायाभूत समितीने  मान्यता दिलेली आहे,  या 35 किलोमीटरमध्ये 9 कि.मी. मेट्रो अंडरग्राऊंड असेल. उर्वरीत मेट्रो एलिव्हेटेट असेल. विशेषत: जे महत्त्वाचे स्टेशन आहेत. कुर्ल्यासारख्या स्टेशला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल. यामध्ये एकूण 25 स्टेशन असणार आहेत.  जवळपास 3 वेगवेगळ्या मेट्रो मार्गांचं इंट्रोसेक्शन यातून होईल. रहदारीच्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल. 18 हजार कोटी रुपयांचं या प्रकल्पाचं इस्टिमेशन आहे.

हा मेट्रो प्रकल्प पुढील साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मी दिले आहेत - देवेंद्र फडणवीस 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पीपीपी तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत. यामध्ये 20 टक्के वीजेएफ हा केंद्र सरकारचा असेल आणि 20 टक्के वीजेएफ महाराष्ट्र सरकारचा असेल. उर्वरीत त्याचा खर्च पीपीपी ऑपरेटर आणेल. साधारण ही मेट्रो 5 वर्षात पूर्ण व्हावी, असा आरखडा तयार करण्यात आलाय. पण ही मेट्रो मी साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पामुळे दोन मुंबई आणि नवं मुंबईचं विमानतळ जोडलं जाईल. शिवाय महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईतील महत्त्वाचा भाग देखील या प्रकल्पामुळे जोडला जाणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ, मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय

    follow whatsapp