खासदार संजय राऊतांना कर्करोग झाल्याचं कधी समजलं? कोणता कॅन्सर झाला? स्वत: सांगितलं

Sanjay Raut diagnosed with cancer : "मी शरद पवारांना आजारपणाबाबत सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं किमोची सायकल घ्यावी लागेल. अमूक आहे, तमूक आहे. मग त्यांनी स्वत: काय केलं. डॉक्टर कोण? असं सगळं सांगितलं. शरद पवार म्हणाले, तुम्ही जेवढी हिंमत दाखवाल, तेवढे लवकर बरे व्हाल. हे हिंमतीवर असतं. तुम्ही जेवढी जास्त हिंमत दाखवाल. उभे राहाल. डिप्रेशनमध्ये जायचं नाही", असंही संजय राऊत यांनी नमूद केलं. 

Sanjay Raut diagnosed with cancer

Sanjay Raut diagnosed with cancer

मुंबई तक

25 Jan 2026 (अपडेटेड: 25 Jan 2026, 09:50 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

खासदार संजय राऊतांना कर्करोग झाल्याचं कधी समजलं?

point

कोणता कॅन्सर झाला? स्वत: सांगितलं

Sanjay Raut diagnosed with cancer : "दिवाळीच्या 2-4 दिवस आधी मला अचानक कॅन्सरचं निदान झालं. आपण दौरे करतो, प्रवास करतो. अनेक दुखणी आपण अंगावर काढतो. उशीरा झोपलो असेल, आपण काहीतरी खाल्लं असेल, असं आपण म्हणतो. पण माझा भाऊ आहे, सुनील राऊत जो आमदार आहे. त्यांना काय वाटलं मला माहिती नाही, त्यांनी माझं रक्त चेक केलं. त्यातून ते निष्पन्न झालं. मला पोटामध्ये कॅन्सर आहे", असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या आजरपणाबाबत सविस्तर भाष्य केलं. 

हे वाचलं का?

संजय राऊत म्हणाले, मला कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं तेव्हा मी हसलो. काय म्हणतो हो का? म्हणालो ठीक आहे. बघूयात आपण आता.. मला सांगितलं तुला उद्याच अॅडमिट व्हावं लागेल. मी म्हणालो उद्या लगेच कसं होणार? उद्याचं आपलं सगळं शेड्युल ठरलंय. मात्र, कुटुंबाने उपचारासाठी हट्ट केला. ऐन दिवाळीत किमोथेरेपी रेडिएशन हे उपचार घेतले. यातनादायी उपचार आहेत. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. मी जवळ-जवळ दीड महिना बंदिस्त होतो. कधी रुग्णालयात होतो, कधी घरी होतो. खूप अडचणी असतात. पाणी देखील पिता येत नाही. मात्र, त्यातून आता बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. मला शक्य झालं तेव्हा बाहेर यायचो. उद्धवजींचा त्याच्यावर फार कटाक्ष असतो. हा बाहेर कसा येतो? याला परवानगी दिलेली नाही. त्याला बाहेर सोडू नका. सगळ्याचं प्रेम आहे. मी बरा व्हावं, यासाठी सगळ्याचं प्रेम आहे. मी आजारपणाच्या बाबतीत अतिशहाणपणा करु नये, असं सर्वांना वाटतं. मात्र, तरी मला वाटतं की, आपल्याला यातना विसरायच्या असतील तर आपण कामात राहिलं पाहिजे. मी हॉस्पिटलमध्ये असताना वाचत होतो, लिहित होतो. फोनवरुन बोलायचो. 

मी शरद पवारांना आजारपणाबाबत सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं किमोची सायकल घ्यावी लागेल. अमूक आहे, तमूक आहे. मग त्यांनी स्वत: काय केलं. डॉक्टर कोण? असं सगळं सांगितलं. शरद पवार म्हणाले, तुम्ही जेवढी हिंमत दाखवाल, तेवढे लवकर बरे व्हाल. हे हिंमतीवर असतं. तुम्ही जेवढी जास्त हिंमत दाखवाल. उभे राहाल. डिप्रेशनमध्ये जायचं नाही. त्यापद्धतीने मी उभा राहिलो. आणखी उपचार सुरु आहेत, काही शस्त्रक्रिया व्हायच्या आहेत, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जालना : कॉलेजला निघालेल्या तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवून आळंदीला नेलं, अन् थेट लग्नच केलं

 

    follow whatsapp