'कैसा हराया' फेम नगरसेविका सहर शेख यांचा माफीनामा, किरीट सोमय्यांची माहिती; 'ते' वक्तव्य भोवलं

Sahar Shaikh Apology : 'कैसा हराया' फेम नगरसेविका सहर शेख ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर केलेल्या विजयाच्या भाषणात मुंबईला हिरवी करु असं चिथावणीखोर विधान तिनं केलं होतं. तिच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची तक्रार भाजप नेते किरिट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याविषयी तिनं माफी मागितली आहे.

Sahar Shaikh Apology

Sahar Shaikh Apology

मुंबई तक

24 Jan 2026 (अपडेटेड: 24 Jan 2026, 12:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'कैसा हराया' फेम नगरसेविका सहर शेख यांचा माफीनामा

point

किरीट सोमय्यांची माहिती

Sahar Shaikh Apology : मुंब्रा येथील एमआयएमची नवनिर्वाचित तरुण नगरसेविका सहर शेख ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर केलेल्या विजयाच्या भाषणात संपूर्ण मुंब्रा हिरवा करु असं चिथावणीखोर विधान तिनं केलं होतं. तिच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची तक्रार भाजप नेते किरिट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर सहर शेख हिनं आपल्या वक्तव्याविषयी लेखी स्वरुपात माफी मागितल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल, सत्ताधाऱ्यांनी पळवल्याचा दावा, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

'भारताच्या तिरंग्यासाठी आयुष्यभर काम करणार'

नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर केलेल्या विजयाच्या भाषणात सहर शेख ही 'कैसा हराया' असं म्हणत चर्चेत आली होती. यावेळी तिनं मुंबई हिरवी करु असं वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यानं चांगलीच खळबळ माजली. यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी तिला दोनदा बोलावलं होतं. यानंतर आता सहरनं लेखी स्वरुपात माफी मागितली आहे. यामध्ये तिनं लिहिलं आहे की, 'कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. याबद्दल मी माफी मागते. माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे, मात्र भारताच्या तिरंग्याची मी आयुष्यभर काम करत राहीन.'

सहर शेखच्या "माफीनामा"

AIMIM ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा सहर शेखनी हिंदुना चिथावणी देणाऱ्या

"हम मुंब्रा को हरा बना देंगे"
ह्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.

मुंब्रा पोलिसांनी माझा तक्रारी नंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती. मी आज पाठपुरावा साठी मुंब्रा पोलिस… pic.twitter.com/ln9LaeESQe

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 24, 2026

 'एमआयएम ही नवी मुस्लीम लीग' 

माध्यमांशी बोलताना किरिट सोमय्या यांनी सांगितलं की,' सहर ही २२ वर्षीचा तरुण मुलगी आहे. तिने माफी मागितली आहे. तिच्या माफीचा आम्ही स्वीकार करतो.' मात्र यावेळी सोमय्या यांनी एमआयएमवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, 'एमआयमचे नेते नव्या पीढीला कट्टरतावादी बनवत आहेत. एमआयएम ही नवी मुस्लीम लीग आहे. लोकांना भडकावण्याचं काम हा पक्ष करत आहे. त्यांनी मालेगावला हिरवं केलं, मानखुर्दला हिरवं केलं, मुंब्र्याला हिरवं केलं आणि आता ते मुंबईला हिरवी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. या मुस्लीम कट्टरपंथी नेत्यांना बाहेरुन मदत मिळत असते. ते नव्या पीढीला बरबाद करत आहेत. जिथं भाजप सत्तेत आहे, तिथं आम्ही कोणताही भेदभाव केलेला नाही. हिंदू असो किंवा मुस्लीम, सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत. मोदी सरकारच्या सगळ्या योजना या सर्वांसाठी आहेत. मात्र काही कट्टरपंथी येत्या काही वर्षात मुंबईला मुस्लीम बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र त्याविरोधात आता फडणवीस सरकार मैदानात उतरले आहे.'

हे ही वाचा : म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख, एकनाथ शिंदे अन् सरन्यायाधीशांचा ‘तो’ फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा

तक्रारीनंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

सहर सेख विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर तिला दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आले. याविषयी मुंब्र्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले की, 'किरिट सोमय्या यांनी आम्हाला सेहर शेख विषयी एक निवेदन दिले होते. त्यानंतर आता सहरने माफी मागितली आहे. तिचा माफीनामा आम्ही किरिट सोमय्यांना दाखवला आहे. तसंच आम्ही तिला लिखित स्वरुपात सावधानतेचा इशारा दिला आहे. तिने सांगितले आहे की, ती तिरंग्यासाठी मरण्यासाठीही तयार आहे. कलम 168 नुसार तिला नोटिस देण्यात आली होती.' 

    follow whatsapp