अजित दादांच्या निधनानंतर मनोज जरांगे हळहळले, दादांची दुःखद बातमी कळाली अन्..

Ajit Pawar : अजित दादांच्या अपघातानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Ajit Pawar

Ajit Pawar

मुंबई तक

28 Jan 2026 (अपडेटेड: 28 Jan 2026, 01:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित दादांच्या अपघातानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया 

point

विमान अपघातात अजितदादांसह या व्यक्तींचा मृत्यू 

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात मृ्त्यू झाला. या विमान अघातात अजित  पवारांसह काही सहकाऱ्यांचा देखील मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित दादांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणाची मोठी हानी निर्माण झाली आहे. यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं आहे, असा शोक त्यांनी व्यक्त केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महाराष्ट्रावर शोककळा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

अजित दादांच्या निधनानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया 

अजित दादांच्या जाण्यानं राज्यभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अजित दादांच्या निधनाची माहिती समजताच त्यांनी दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, आपल्या दादांची दुःखद बातमी कळाली, ही बातमी मनाला न पाटणारी असल्याची भावना मनोज जरांगे यांनी केली आहे. 

नंतर ते म्हणाले की, अजित पवार यांच्यासारखा नेता होणे नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, राज्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दादा चांगलं काम करायचे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांचे आज विविध ठिकाणी जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले होते. याचपार्श्वभूमीवर ते बारामतीच्या दौऱ्यावर गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली.

हे ही वाचा : बारामतीत विमानाचा भीषण अपघात, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

विमान अपघातात अजितदादांसह या व्यक्तींचा मृत्यू 

अजित पवारांसह विमानात पीएसओ एचसी विदीप जाधव, पायलट कॅप्टन कपूर यांचा देखील मृत्यू झाला. कॅप्टन संभवी पाठक तसेच  फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांनी देखील आपला जीव गमावला. 

    follow whatsapp