Ajit Pawar Death: अजितदादांचं विमान क्रॅश होताच बनलं फायर बॉल, Crash Site चे अत्यंत भयंकर Photos

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामतीजवळ कोसळले. विमान कोसळताच त्याचा भीषण स्फोट झाला आणि त्याला आग लागली, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाचे मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

maharashtra dcm ajit pawar plane turned into a fireball upon crashing terrifying photos from crash site

Ajit Pawar Death

मुंबई तक

• 01:00 PM • 28 Jan 2026

follow google news

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. बुधवारी (28 जानेवारी) मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांच्या विमानाच क्रॅश लँडिंग झालं. धावपट्टी सोडून विमान हे एका नजीकच्या शेतात कोसळले आणि पूर्णपणे जळून खाक झाले, ज्यामध्ये अजित पवारांसह विमानातील सहाही जणांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

विमान कोसळताच लागली आग

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मुंबईहून बारामतीला प्रवास करत होते. ते या परिसरातील चार निवडणूक प्रचार कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. ज्या भागात अपघात झाला तो बारामतीजवळ आहे. विमान शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाला आग लागली. धूर, आग पाहून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पाच स्फोटांसह विमान जळून खाक 

अजित पवारांचे विमान लँडिंग स्ट्रिप सोडून जवळच्या भागात कोसळले. विमान उतरवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे नियंत्रण सुटले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरवण्याचा प्रयत्न करत असतानाच ते धावपट्टीऐवजी जवळच्या शेतात कोसळले. अपघातानंतर, अंदाजे पाच स्फोट झाले, ज्यामुळे विमान आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि सर्वजण मृत्युमुखी पडले.

अपघातस्थळी गर्दी

विमानात एकूण 6 जण होते, त्यापैकी सर्वांचा मृत्यू झाला. अजित पवार बुधवारी बारामती येथे येणार होते, जिथे ते चार जाहीर सभांना संबोधित करणार होते. पण त्याआधीच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. विमान धावपट्टीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला असल्याचे समजते आहे.

व्हीएसआर ऑपरेटरचे लीअरजेट-45 विमान

अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते व्हीएसआर ऑपरेटरच्या मालकीचे लीअरजेट-45 विमान (नोंदणी क्रमांक व्हीटी-एसएसके) होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एक पीएसओ, एक अटेंडंट आणि दोन फ्लाइट क्रू मेंबर्स (पायलट-इन-कमांड आणि फर्स्ट ऑफिसर) यांच्यासह एकूण 6 जण विमानात होते.

बारामती येथे विमान क्रॅश-लँडिंग झाले. या अपघातात दोन्ही पायलटसह कोणीही प्रवासी वाचले नसल्याचे वृत्त आहे.

पोलीस आणि प्रशासकीय पथकांचं मदत आणि बचाव कार्य

अपघातानंतर, बचाव कार्यात मदत करण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी पोहोचली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला वेढा घातला आणि सुरक्षा व्यवस्था कडक ठेवली आहे. अद्यापही विमानाचे अवशेष घटनास्थळीच आहेत.

विमानाला लागलेली आग विझविण्यासाठी स्थानिक रहिवासी हे पाण्याच्या बादल्या घेऊन तिथे पोहोचले होते. दरम्यान, पोलीस अपघाताचे कारण शोधत आहेत. या दुःखद अपघातानंतर केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामान्य जनतेतही शोककळा पसरली.

    follow whatsapp