अजित पवार यांचे कधीही न पाहिलेले फोटो आले समोर

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना आहे. अशातच अजित पवार यांचे भूतकाळातील कधीही न पाहिलेले फोटो समोर आलेले आहेत.

ADVERTISEMENT

social share
google news
Ajit pawar Unseen Photo

1/7

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवार 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा विमान अपघात सकाळी झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने राज्यातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचं वृत्त आहे.  

Ajit pawar Unseen Photo

2/7

अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीपासून काही अंतरावर विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं. ही घटना सकाळी 8 : 50 वाजता घडली आहे. या अपघातात विमानाचे तुकडे झाले, तसेच इतर काही लोकांचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली. 

 

Ajit pawar Unseen Photo

3/7

अजित पवार यांच्या जाण्याने राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हवामान दृश्यमानता आणि धुक्यामुळे विमानाचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. 

Ajit Pawar death

4/7

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबासह राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि अजित पवार यांच्या बहीण सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॅट्सअॅपवर 'Devastated' असं लिहून हळहळ व्यक्त केली. नुकत्याच सुप्रिया सुळे या आपल्या वहिणी सुनेत्रा पवार यांच्यासह बारामतीत दाखल झाल्याचं वृत्त आहे. 
 

Ajit pawar Unseen Photo

5/7

विकासाची कास धरून काम करणारा नेता अशी अजित पवार यांची ओळख होती. त्यांचे आपल्या बारामतीकडे अनेक दौरे सुरुच असायचे. 

Ajit pawar Unseen Photo

6/7

शिव, शाहु, फुले आणि आंबेडकर यांचे विचार घेऊन ते राजकारण करत होते. धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य देऊन काम करणारे नेते अशी त्यांची ओळख होती. 
 

Ajit Pawar Unseen Photo

7/7

अजित पवारांकडे हजरजबाबीपणा होता, त्यांच्या जे पोटात ते ओठात होते, अजितदादा एक स्पष्टवक्ते देखील होते. हे अजितदादांचे कधीही न पाहिलेले फोटो आहेत. 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp