Ajit Pawar : राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली. यानंतर आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्य हादरून गेले आहे. अशातच राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या निधनावरून कोणीही कृपया राजकारण करू नये, हा एक अपघातच असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अजित पवार यांचे कधीही न पाहिलेले फोटो आले समोर
अजित पवार यांच्या जाण्याने शरद पवारांचं मन हेलावलं
शरद पवार म्हणाले की, 'अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात'.
हे ही वाचा : Ajit Pawar यांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?
कृपया ह्यात राजकारण आणू नये - शरद पवार
'मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे,' असं शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT











