Ajit Pawar Death : अजित पवारांच्या प्रायव्हेट चार्टरला कोणती कंपनी ऑपरेट करत होती?

Ajit Pawar Death : मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार ज्या विमानामध्ये प्रवास करत होते, ते विमान Learjet 45 होते. त्या विमानाचा रजिस्ट्रेशन नंबर VT-SSK आहे. हे विमान VSR एविएशन नावाची कंपनी ऑपरेट करत होती. विमान दुर्घटनेनंतर PTI या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिलीये. VSR एव्हिएनश ही प्रायव्हेट चार्टर सेवा देणारी कंपनी आहे. 

Ajit Pawar Death

Ajit Pawar Death

मुंबई तक

28 Jan 2026 (अपडेटेड: 28 Jan 2026, 02:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांच्या प्रायव्हेट चार्टरला कोणती कंपनी ऑपरेट करत होती?

point

अजित पवारांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्य सुन्न

Ajit Pawar Death : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आता त्यांचं प्रायव्हेट चार्टर ऑपरेट करणाऱ्या कंपनीवर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. बारामतीतील दुर्घटनेत अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालाय. विमानात प्रवास करणारं  कोणीही वाचू शकलेलं नाही. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार ज्या विमानामध्ये प्रवास करत होते, ते विमान Learjet 45 होते. त्या विमानाचा रजिस्ट्रेशन नंबर VT-SSK आहे. हे विमान VSR एविएशन नावाची कंपनी ऑपरेट करत होती. विमान दुर्घटनेनंतर PTI या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिलीये. VSR एव्हिएनश ही प्रायव्हेट चार्टर सेवा देणारी कंपनी आहे. 

हेही वाचा : Ajit Pawar Death : 'जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारे नेते..' अजित पवारांबद्दल राज ठाकरेंची भावूक पोस्ट

ही कंपनी बिझनेस करणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा हाय प्रोफाईल व्यक्तींसाठी 'वेळेचा योग्य वापर' करण्यासाठी मदत करणारी आहे, असं बोललं जातं. VSR ही कंपनी नवी दिल्ली, हैद्राबाद आणि भोपाळमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं जातं. आम्हाला 15 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव असल्याचं कंपनी सांगते. या कंपनीकडे 60 पेक्षा जास्त वैमानिक आहेत. शिवाय आमचे 99 टक्के ग्राहक समाधानी असल्याचा दावा कंपनी करत असते. बारामतीतील अजित पवारांच्या अपघातानंतर VSR एव्हिएशनचं मागील रेकॉर्ड देखील चर्चेत आलं आहे. 14 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या Learjet 45XR (VT-DBL) हे विमान मुंबई विमानतळावर लँड होताना अपघातग्रस्त झालं होतं. 

मुंबईतील अपघातावेळी विमान विशाखापट्टनमहून मुंबईकडे येत होते. यामध्ये देखील 6 लोक प्रवास करत होते. एक सिनियर आणि एक जुनिअर वैमानिक हे विमान हँडल करत होते. मुंबई एअरपोर्टवरील पाऊस आणि कमी असलेल्या दृश्यमानतेमुळे विमानाला रनवे 27 वर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, लँडिंगवेळी विमान रनवेपासून डावीकडे भटकलं. त्यानंतर या विमानाचं क्रॅश लँडिग झालं होतं. दुर्घटनेनंतर विमानाचे दोन तुकडे झाले होते. मात्र, तरीदेखील यामधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं होतं. वैमानिक जखमी झाले होते,मात्र उपचारानंतर ते बरे झाले होते. 
 

हेही वाचा : Ajit Pawar Death : '...आपल्या समोर ते अचानक गळून पडल्याचे पहाणे वेदनादायी' श्रीनिवास पाटील हळहळले

    follow whatsapp