Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीला जाणारे त्यांचे विमान लँडिंग करताना कोसळले. विमान एका शेतात कोसळले आणि पूर्णपणे जळून खाक झाले. अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. दाट धुके आणि परिसरातील कमी दृश्यमानता ही या अपघाताची मुख्य कारणे असल्याचे उघड झाले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ajit Pawar Death : 'त्या' एका वस्तूमुळे अजितदादांची बॉडी ओळखता आली, न पाहावणारी दृश्य
अपघाताचे नेमके कारण काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान आणि कमी दृश्यमानता असल्याचे बोलले जात आहे. अपघाताच्या वेळी हवाई पट्टीवर दाट धुके पसरल्याने दृश्यमानता सुमारे 800 मीटरपर्यंत कमी झाली होती. या कमी दृश्यमानतेमध्येच विमान उतरवण्याचा प्रयत्न केल्याने ते कोसळले असल्याची माहिती आहे. बारामतीतील या हवाई पट्टीवर रात्रीच्या वेळी लँडिंगची सुविधा नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे धुके आणि कमी दृश्यमानतेमध्ये लँडिंग करणे धोक्याचे ठरते.
'असा' झाला अपघात
अजित पवार हे मुंबईहून बारामतीला निघाले होते. ज्या भागात हा अपघात झाला तो भाग बारामतीजवळ आहे. याठिकाणी विमान एका शेतात कोसळले. स्थानिकांनी अपघाताचा आवाज ऐकला आणि धूर येताना पाहिला. यानंतर त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. विमान लँडिंग स्ट्रिपवरून घसरले आणि जवळच्या भागात कोसळले. लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना विमानाचे नियंत्रण सुटले. स्थानिकांनी याविषयी सांगितले की, 'विमान काही क्षणांतच कोसळले. अपघातानंतर पाच स्फोट झाल्याने आग लागली.
हे ही वाचा : Ajit Pawar Death: अजितदादांचं विमान क्रॅश होताच बनलं फायर बॉल, Crash Site चे अत्यंत भयंकर Photos
मृतदेहांची ओळख पटवणे कठीण
हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले होते. मृतदेहावरील कपडे आणि त्यांच्या काही वस्तूंवर ओळख पटवण्यात आली. दरम्यान, प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, धुके आणि कमी दृश्यमाना या कारणांमुळे हा अपघात झाला.
ADVERTISEMENT











