मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळील विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई Tak सोबत बोलताना अजित पवारांबाबतच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या, यावेळी त्या अक्षरशः कळवळल्याचंही दिसून आलं. अजित पवारांना 'दादा' म्हणून संबोधित करत पक्ष परिवारासाठी ते आधारस्तंभ होते, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
ADVERTISEMENT
रुपाली चाकणकर यांची नेमकी प्रतिक्रिया
'दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला वेळेत पोहोचणारे दादा वेळेआधीच निघून गेले. खरं तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची तयारी चालू होती. आमच्या कार्यकर्त्यांनी भेटीची वेळ मागितली होती त्यासाठी दादांनी उद्या भेट दिली होती. राज्य महिला आयोगाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम 10 तारखेला होता. त्याला येण्याचा शब्दही दादांनी दिला होता. खरं तर अजूनही या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाहीए. आम्ही सगळेच कार्यकर्ते निशब्द झालो आहोत..'
'खरं तर दादाशिवाय महाराष्ट्र ही कल्पनाच आम्ही कार्यकर्ते करू शकत नाही. विरोधकांना पण दादा हवेहवेसे वाटायाचे. राजकारणातले रोखठोक स्पष्टवक्ते दादा आणि राजकारण झालं गेलं सोडून द्या पुढे चला म्हणत विरोधकांनाही आपलंस करणारे दादा होते. त्यामुळे महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस हळहळतोय.'
'खरं तर उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न दादांनी दाखवलं आणि पूर्ण करण्यासाठी ते रात्रं-दिवस कष्ट करत होते. त्यामुळे दादांशिवाय महाराष्ट्राची कल्पना होऊ शकत नाही, राजकारणाची कल्पना होऊ शकत नाही..'
पार्श्वभूमी आणि पक्षातील प्रभाव
रुपाली चाकणकर या अजित पवार गटाच्या एनसीपीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाच्या महिला विभागाच्या प्रमुख म्हणून काम करत होत्या. त्यांच्या प्रतिक्रियेत अजित पवारांनी महिलांना राजकारणात संधी देण्याच्या भूमिकेचा उल्लेख करून, त्यांच्या योगदानाची आठवण काढली आहे. पक्ष सूत्रांनुसार, अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हे ही वाचा>> Ajit Pawar Death: अगदी बाजूलाच Runway, तरी शेवटच्या क्षणी काय चुकलं?, एका मिनिटात सगळंच संपलं!
प्रतिक्रिया आणि शोक
रुपाली चाकणकर यांच्यासोबतच अनेक पक्ष कार्यकर्त्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. एका कार्यकर्त्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "दादा आमचे मार्गदर्शक होते, त्यांची जागा कोणीही भरू शकत नाही."
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांच्या निधनानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला असून, तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











