आमचा दादा लय रुबाबदार, अजूनही विश्वास बसत नाही, अजितदादांबद्दल आदर्श शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

Ajit Pawar Death : "माझी त्यांना आवडणारी गाणी त्यांच्या समोरंच मी गायचो. “अजून एक गाणं होऊदे” हे तुमचे शब्द आजूनही माझ्या कानात आहेत आणि ही दाद माझ्यासाठी फार मोलाची आहे. “आमचा दादा लय रुबाबदार” हे गाणं मी नेहमी तुमच्यासमोर अभिमानाने गायचो. आता हे गाणं मी कधीच live गाऊ शकणार नाही. तुमच्या अशा जाण्याने खूप मोठा धक्का आम्हा सर्वांना बसलाय. मला नेहमी भरभरून आशीर्वाद आणि खूप प्रेम तुम्ही दिलं. भावपूर्ण श्रद्धांजली "

Ajit Pawar Death

Ajit Pawar Death

मुंबई तक

29 Jan 2026 (अपडेटेड: 29 Jan 2026, 12:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आमचा दादा लय रुबाबदार, अजूनही विश्वास बसत नाही

point

अजितदादांबद्दल आदर्श शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

Ajit Pawar Death :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (दि.28) बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आज (दि.29) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलीये. दरम्यान, महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील लोक अजितदादांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अजित पवारांनी सर्व क्षेत्रातील विकासासाठी मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील माणूस हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळतोय. गायक आदर्श शिंदे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट करुन दिली. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

आदर्श शिंदे फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, ह्या घटनेवर अजूनही विश्वास बसत नाहिये. सगळ्यांचे दादा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवस रात्र काम करणारे दादा आज आपल्यात नाही हे सहन होत नाही. माझा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला दादा येणार म्हटलं की दादा वेळेच्या आधी पोहोचून, माझी गाणी ऐकून मग सभेला सुरुवात करायचे, त्यामुळे माझी त्यांना आवडणारी गाणी त्यांच्या समोरंच मी गायचो. “अजून एक गाणं होऊदे” हे तुमचे शब्द आजूनही माझ्या कानात आहेत आणि ही दाद माझ्यासाठी फार मोलाची आहे. “आमचा दादा लय रुबाबदार” हे गाणं मी नेहमी तुमच्यासमोर अभिमानाने गायचो. आता हे गाणं मी कधीच live गाऊ शकणार नाही. तुमच्या अशा जाण्याने खूप मोठा धक्का आम्हा सर्वांना बसलाय. मला नेहमी भरभरून आशीर्वाद आणि खूप प्रेम तुम्ही दिलं. भावपूर्ण श्रद्धांजली 

सूरज चव्हाणनेही व्यक्त केली हळहळ 

बिग बॉस फेम अभिनेता सूरज चव्हाण म्हणाला, मित्रांनो माझा देव चोरला आज...मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय…माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन 🙏🏻🙏🏻💔💔💔 दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 
तुमचाच सूरज 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Death: अगदी बाजूलाच Runway, तरी शेवटच्या क्षणी काय चुकलं?, एका मिनिटात सगळंच संपलं!

    follow whatsapp