भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवली, त्याच मामा पगारेंना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतलं, डोंबिवलीत मोठं आंदोलन

Harshvardhan Sapkal took Mama Pagare : भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवली, त्याच मामा पगारेंना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतलं, डोंबिवलीत मोठं आंदोलन

Mumbai Tak

मुंबई तक

11 Oct 2025 (अपडेटेड: 11 Oct 2025, 01:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप पदाधिकाऱ्यांनी मामा पगारेंना साडी नेसवली

point

हर्षवर्धन सपकाळ यांनी मामा पगारेंना खांद्यावर घेतलं

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली म्हणून काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यकर्ते असलेल्या मामा पगारे यांना साडी नेसवली होती. दरम्यान, त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील मामा पगारे यांना फोन केला होता. दरम्यान, आज काँग्रेसकडून डोंबिवलीत मोठं आंदोलन करण्यात आलं असून मामा पगारे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतलंय.

हे वाचलं का?

भाजप पदाधिकाऱ्यांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल, हर्षवर्धन सपकाळ यांनी मागणी 

डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा मागणीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डोंबिवलीत मोठं आंदोलन केलं आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मामा पगारे यांना खांद्यावर उचलून मंचावर घेऊन गेले. तसेच त्यांनी मामा पगारे यांचा बाबासाहेबांची , बुद्धांची प्रतिमा आणि संविधान देऊन सत्कार केला.

मामा पगारेंसाठी काँग्रेसचं डोंबिवलीत मोठं आंदोलन 

डोंबिवलीतील भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, कर्णमदन जाधव, दत्ता माळेकरसह पदाधिकाऱ्यांनी 72 वर्षीय काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी पगारे मामा यांना भर रस्त्यात साडी नेसून गैरवर्तन करताना करताना जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. जातीचा उल्लेख करून बहुजन समाजाचा अपमान भाजपच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे गैरवर्तन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्ह दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आंदोलनाचे आयोजन केले होते. हे आंदोलन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली...

जशी मोगलाई होती फडणविशाही आता आली आहे, असे कृत्य करणाऱ्यांना फडणवीस पाठीशी घालतात, असंही यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मी सामान्य परिवारातला आहे, माझ्या समस्या नाही, कारखाने नाहीत. मात्र त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या ओळखाव्यात. कर्जमाफीचं आश्वासन विसरू नये. मला विसरले तरी हरकत नाही, असंही सपकाळ यांनी नमूद केलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

विवाहितेचे एकाच वेळी दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध! संतापलेल्या प्रियकराने दिली मोठी शिक्षा, मुलीला सुद्धा सोडलं नाही...

 

 

    follow whatsapp