छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही, देवेंद्र फडणवीसांकडून क्लीन चीट मिळताच योगेश कदमांची पोस्ट

Yogesh Kadam facebook post : छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही, देवेंद्र फडणवीसांकडून क्लीन चीट मिळताच योगेश कदमांची पोस्ट

Mumbai Tak

मुंबई तक

11 Oct 2025 (अपडेटेड: 11 Oct 2025, 10:36 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही, योगेश कदमांची पोस्ट चर्चेत

point

देवेंद्र फडणवीसांकडून क्लीन चीट मिळताच योगेश कदमांची पोस्ट

Yogesh Kadam facebook post : मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या सचिन घायवळ या गुंडाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्रपरवाना दिल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता. ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत योगेश कदमांवर गंभीर आरोप केले होते. शिवाय योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आणि योगेश कदम यांना क्लीनचीट दिली. त्यानंतर योगेश कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, जी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस योगेश कदमांना क्लीनचीट देताना काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'एक सुनावणी गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती. पण हा परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे हा परवाना दिलेला नाही. परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की, अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता. परंतु परवाना दिला गेलेला नाही.'

हेही वाचा : नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पंड्या आता नव्या मॉडेलच्या प्रेमात पडला, इन्स्टाग्रामवर बीचवरील फोटो शेअर

योगेश कदम यांची पोस्ट जशीच्या तशी

2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते.

पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खाजगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच, ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार!

गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काहीजणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती.

असो, राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहणार आहे.शेवटी असंच म्हणावं वाटतं की,

“छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही.” – योगेश कदम

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : अजित पवार स्वत:च्या पक्षातील आमदारावरच संतापले, झाप झाप झापलं, कारणे दाखवा नोटीसही पाठवणार

    follow whatsapp