Supriya Sule : राजकारण म्हटलं की, सत्ताधारी आणि विरोधक हे आलेच. पण, आता याच सत्ताधारी आणि विरोधकांनी एकाच स्टेजवर डान्स करत पक्षीय भेद विसरून एकत्रित व्यासपीठावर आपल्या जीवनाचा आनंद घेतला आहे. बारामतीच्या खासदार आणि शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे, तसेच भाजप खासदार कंगना राणौत आणि महुआ मोइत्रा या लग्नसमारंभात एकत्र थिरकल्याचं दिसून आले, त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : इंदापुरात ट्रॅक्टर-ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ट्रॅक्टर चालकाचा आगीत होरपळून दुर्दैवी अंत
भाच्याचा विवाहाला सुप्रिया सुळेंची दांडी पण...
नुकताच, सुप्रिया सुळे यांचा भाचा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवारचा परदेशात विवाह सोहळा पार पडला. पण, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी त्या लग्नसोहळ्याला आपली उपस्थिति दर्शवली नाही. पण, अशातच सुप्रिया सुळे कंगना राणौतसोबत भाजप नेते प्रवीण जिंदालच्या मुलीच्या लग्नात नाचताना दिसत आहेत. त्यांचा डान्स हा सध्या सर्वत्र व्हायरल होत असून चर्चेचा विषय होत आहे.
'ओम शांती ओम' या बॉलिवूड गाण्यावर ठेका
याआधी कंगना राणौतने तिच्या सोशल मीडियावरील स्टोरीला डान्सच्या रिहर्सलचा व्हिडिओ शेअर केला होता. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या लग्नातील डान्सचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकदम फिल्मी स्टाईलने या संसद सदस्यांनी 'ओम शांती ओम' या बॉलिवूड गाण्यावर ठेका धरला होता.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, प्रेमसंबंध असणाऱ्या लोकांनी फक्त 'हे' करा
उद्योगपती आणि जिंदाल स्टील अँड पॉवरचे अध्यक्ष नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नातील हा व्हिडिओ आहे. सुप्रिया सुळे आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत यांच्यातील असलेला पक्षीय भेद विसरून त्या एकत्र आल्या आणि थिरकल्या आहेत, याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होताना दिसते.
ADVERTISEMENT











