मुंबई: 'भविष्यात एकनाथ शिंदे हे जरी उद्धव ठाकरेंसोबत गेले तरीही मी त्यांच्यासोबत राहणार. साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर मी राहणार..' असं मोठं आणि भुवया उंचावणारं विधान शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी केलं आहे. मुंबई Tak चावडीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
पाहा मुंबई Tak चावडीवर निलेश राणे नेमकं काय म्हणाले
प्रश्न: तुम्ही गेले काही दिवस सतत म्हणत आहात की, शिदें साहेबांसोबत शेवटपर्यंत राहणार.. कारण त्यांनी राजकारणात मला पुनर्जिवीत केलंय... राजकारण कधी काही होऊ शकतं. म्हणजे आपल्याला कधी वाटलं नव्हतं की, फडणवीस हे अजित पवारांशी युती करतील. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत युती करतील.. समजा, भविष्यात एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसोबत गेले तेव्हा निलेश राणे काय करणार?
निलेश राणे: जिथे शिंदे साहेब राहतील तिथे मी राहणार.
प्रश्न: म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत काम करणार?
निलेश राणे: तुम्ही जर-तर विचारतायेत... गेलेत का? मी शिंदे साहेबांसोबत राहणार.. साहेब जे निर्णय घेतील.. त्या निर्णयाबरोबर मी राहणार.. आता याच्यापेक्षा स्पष्ट काय बोलू मी..
हे ही वाचा>> मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत घबाड सापडलं, निलेश राणेंनी थेट पोलीस स्टेशन गाठलं
प्रश्न: एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं होतं आणि ते गुवाहटीला गेले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितलं होतं की, काळजी करू नका.. आपल्या पाठिशी महाशक्ती आहे. आता तुम्ही ही सगळी प्रकरणं उघड करत होतात.. तुम्हाला असं सांगण्यात नाही आला का? की, तुम्ही महाशक्तीशी पंगा घेताय. हा प्रश्न अशासाठी.. कारण की, तुमचे बंधू नितेश राणे स्वत: म्हणाले होते की, निलेश राणेंना बळीचा बकरा केला जात आहे. एखाद्या राणेला कोणी असं बळीचा बकरा करू शकतं का?
निलेश राणे: मी बोललो नितेशला.. शब्दप्रयोग चुकला तुझा.. त्यानीही मान्य केलं आणि नंतर असं काही झालं नाही. त्याच्या तोंडून ते शब्द निघाले, सुटून गेले. मी म्हटलं सुटून गेले तर ठीकए.. हरकत नाही. हा.. तुमचा काय प्रश्न होता महाशक्तीबाबत?
हे ही वाचा>> निलेश राणेंना मोठा दणका, भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसणे महागात पडले, पोलिसांकडून मोठी कारवाई
प्रश्न: तुम्हाला असं शिंदे साहेबांकडून सांगण्यात नाही का आलं की, महाशक्ती आहे जरा सांभाळून पंगा घेताना...
निलेश राणे: साहेब आम्ही पण काही कमी नाही.. उद्धवजी मुख्यमंत्री होते ना.. तो काळ आठवा. तेव्हा नाही आम्ही डगमगलो, तेव्हा तर आमचं घर पाडायचा प्रयत्न झाला. आमच्या सगळ्याच गोष्टींच्या मागे लागले होते ना.. पण तरी देखील आपण कुठे मागे हटलो.. कोण मागे आहे, कोण तुमच्या समोर आहे ह्याच्यापेक्षा तुमची भूमिका कुठल्या विषयी आहे, तुमची भूमिका तर चुकली नाही ना..
जर तुमची भूमिका योग्य आहे.. मग समोर कोण, आजूबाजूला कोण.. तो फरक पडत नसतो.
ADVERTISEMENT











