युतीधर्म मोडला म्हणून एकनाथ शिंदेंनी पक्षातून हकालपट्टी केली, तेच महेश गायकवाड भाजपच्या वाटेवर?

Mahesh Gaikwad likely to join BJP : युतीधर्म मोडला म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र, तेच महेश गायकवाड आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

13 Oct 2025 (अपडेटेड: 13 Oct 2025, 03:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महेश गायकवाड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

point

युतीधर्म मोडला म्हणून एकनाथ शिंदेंनी केली होती हकालपट्टी

Mahesh Gaikwad likely to join BJP : कल्याण पूर्वेत भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर मोठी कुरघोडी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण कल्याण पूर्वेत युतीधर्म मोडला म्हणून ज्या महेश गायकवाड यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी केली होती, तेच महेश गायकवाड आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.

हे वाचलं का?

महेश गायकवाड हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कल्याण पूर्वेत शहरप्रमुख म्हणून कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची युती झाली. कल्याण पूर्वेची जागा भाजपला सुटली. भाजपने या मतदारसंघात सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. तरीदेखील महेश गायकवाड यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्याविरोधात अपक्ष मैदानात उतरुन निवडणूक लढवली आणि युतीधर्म मोडला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र, तेच महेश गायकवाड आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

गणपत गायकवाड यांना केला होता महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार 

विशेष म्हणजे सुलभा गायकवाड यांचे पती आणि तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. त्यामुळे गणपत गायकवाड यांना तुरुंगात जावं लागलं होतं. मात्र, तरी देखील भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. शिवाय, सुलभा गायकवाड यांनी या निवडणुकीत 26 हजार मतांनी विजय देखील मिळवला. 

महेश गायकवाडांनी विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवली 

महेश गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिल्याने भाजप त्यांना आपल्याकडे खेचून घेत असल्याचे बोलत आहे. विधानसभा निवडणुकीत महेश गायकवाड यांचा 26 हजार मतांनी पराभव झाला. मात्र, त्यांनी तब्बल 55108 मतं मिळवली. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार धनंजय बोदरे या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. त्यांना 39512 मतं मिळवता आली होती. दरम्यान, महेश गायकवाड यांचं संघटन कौशल्य विचारात घेऊन भाजप त्यांना पक्षात घेणार असल्याचे बोलले जात आहे. महेश गायकवाड पक्षात आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला फायदा होऊ शकतो. 

भाजप शिंदेंच्या शिवसेनेवर कुरघोडी करणार?

दुसरीकडे ज्या भाजपमुळे एकनाथ शिंदे यांना महेश गायकवाड यांना पक्षातून काढावं लागलं. त्याच महेश गायकवाडांना पक्ष प्रवेश दिल्यास भाजप शिंदेंवर कशाप्रकारे कुरघोडी करत आहे? याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू शकते. भाजपने महेश गायकवाड यांना प्रवेश दिल्यास एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार? याकडे देखील राजकीय जाणकारांचे लक्ष आहे. 

हेही वाचा : VIDEO : केबीसीमधील स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्याशी उर्मटपणे बोलला, अतिआत्मविश्वास नडला, 5 व्या प्रश्नाला बाहेर

    follow whatsapp