Kolhapur ZP Election Updates: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026) राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.
ADVERTISEMENT
कोल्हापूर जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:
- कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
- कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू
कोल्हापूर जिल्हा परिषद
एकूण जागा - 68भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 9
राष्ट्रवादी - 20
काँग्रेस - 14
शिवसेना (ठाकरे) - 1
जनसुराज्य - 5
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4भुदरगड शिवशाहू-1
इतर- 1
-
कोल्हापुरातील यवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पूजा दिलीप पाटील विजयी
पंचायत समिती - एकूण जागा - 136
भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 10
राष्ट्रवादी - 16
काँग्रेस - 20
शिवसेना (ठाकरे) -
जनसुराज्य - 6
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 2
इतर -2 -
पन्हाळा
कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह यशवंतराव पाटील आणि माजी सरपंच अमर पाटील यांच्यात काटे की टक्कर
अमर पाटील बाबा 259 मतांनी आघाडीवर
जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेला बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीच्या श्रीमती शोभाताई फराकटे विजयी
तर बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राजकुंवर गायकवाड विजयी
-
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार वर्षाराणी पाटील विजयी
-
आमदार सतेज पाटील यांना धक्का
उचगाव मतदार संघात एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा भाजप उमेदवार विजयी
महिलांकडून जल्लोष
-
कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता अरूण डोंगळे विजयी.
-
शिरोळ तालुक्यात दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात उत्तरा विजित शिंदे विजयी ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
-
आलास जिल्हा परिषद मतदारसंघात प्रशांत शहापूरे विजयी ( भाजप)
-
उदगाव जिल्हा परिषदेत अमोल चव्हाण ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
-
अब्दुल्ललाट जिल्हा परिषद मतदारसंघात श्रद्धा गायकवाड ( राजर्षी शाहू विकास आघाडी)
-
यड्रा जिल्हा परिषद मतदारसंघात अर्चना अमोल चौगुले ( काँग्रेस )
-
कुंभारी जिल्हा परिषद गट भाजपच्या श्रृती भोरगुंडे तब्बल 4 हजार 296 मतांनी विजयी
भोरगुंडे 9744
रेणुका इमडे 5449
हे ही वाचा>> Zilla Parishad Election Result: महाराष्ट्रातील 12 महानगरपालिकेचा निकाल एकाच ठिकाणी, पाहा LIVE
ADVERTISEMENT











