Ratnagiri ZP Election Result: रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 03:31 PM)

Ratnagiri ZP Election Result LIVE: रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.

ratnagiri zp election result 2026 see ratnagiri zilla parishad election results live

Ratnagiri ZP Eelection Result

Google CTA

Ratnagiri ZP Election: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026)  राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.  

हे वाचलं का?

रत्नागिरी जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:

  • रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
  • रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 जागांपैकी 8  जागांवर शिंदे शिवसेना आघाडीवर तर 2 जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

रत्नागिरी- संगमेश्वरमधल्या साडवली जिल्हा परिषद गटातून माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांची  पत्नी नेहा माने 65 मतांनी आघाडीवर.

रत्नागिरी

संगमेश्वरमधील कोसुंब जिल्हा परिषद गटात भाजपचे प्रमोद अधटराव 500 मतांनी आघाडीवर

शिंदे शिवसेनेचे रोहन बने पिछाडीवर

या गटात शिवसेना विरुद्ध भाजप मैत्रीपूर्ण लढत

चिपळूण :  

कळवंडे - शिवसेना उबाठा गटाच्या निकिता निकम 1 मताने आघाडीवर (जिल्हा परिषद) 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या हातखंबा जिल्हा परिषद गटातून शिंदे यांच्या शिवसेनेचे सुयोग कांबळे विजयी.

रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद गट विजयी

सुशिल भायजे धामापूर गट- राष्ट्रवादी अजित पवार - ( विजयी)

संतोष थेराडे कडवई ( शिवसेना UBT) ( विजयी)

विशाखा कुवळेकर  कसबा ( UBT)- ( विजयी)

माधवी गीते मचूरी  शिवसेना शिंदे ( विजयी)

प्रमोद अधटराव कोसूंब ( भाजपा)  ( विजयी)

 नेहा माने साडवली (शिवसेना UBT) ( विजयी)

विलास चाळके - दाभोळे (शिवसेना शिंदे)  ( विजयी)