Solapur ZP Election: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी सोलापूर जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026) राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.
ADVERTISEMENT
सोलापूर जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:
- सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
-
राष्ट्रवादी अजित पवार गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा केला पराभव; माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अश्विनी दळवे विजयी
- इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील बावडा गटातून आघाडीवर
-
सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत करमाळ्यात भाजपच्या रश्मी बागल विजयी.
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हापरिषद गटातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी
2637 मतांनी विजयी तर पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनां चपळगाव गणातून 3623 ने आघाडी -
उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हापरिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठा पराभव झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बळीराम काका साठे 4961 मतांनी पराभूत
भाजपचे इंद्रजित पवार यांनी केला बळीराम काका साठे यांचा मोठा पराभव झाला. सलग 7 वेळा बळीराम काका जिल्हापरिषदेचे सदस्य होते.
-
सोलापूर जिल्हा परिषद निकाल
-
भाजप : 39
शिवसेना : 6
राष्ट्रवादी काँग्रेस : 10 -
शिवसेना UBT आणि राष्ट्रवादी शरद पवार गट : 0
राष्ट्रवादी काँग्रेस : 0 -
सोलापूर माळशिरस तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एसपी नागनाथ भोसले विजयी
ADVERTISEMENT











