मतदार याद्यांमध्ये एवढे घोळ असताना निवडणुका कशा घेता? राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला 8 मोठे सवाल

Raj Thackeray questions to State Election Commission : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला 8 मोठे सवाल; बैठकीत काय घडलं?

Mumbai Tak

मुंबई तक

14 Oct 2025 (अपडेटेड: 14 Oct 2025, 02:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला 8 मोठे सवाल

point

मनसेसह महाविकास आघाडीच निवडणूक आयोगाला मोठे सवाल

Raj Thackeray, Mumbai : मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कम्युनिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष पध्दतीने संविधानाचे पूर्ण पालन घेण्यात यावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत बैठक घेतली होती. दरम्यान, या बैठकीवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला काही सवाल केले आहेत.

हे वाचलं का?

राज ठाकरेंनी विचारलेले 7 प्रश्न

निवडणूक लागलेली नाही मग मतदार नोंदणी कशामुळे थांबवली?

वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी मतदान करु नये का?

मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहेत. मतदारांची दोन ठिकाणी नावे आहेत.

अनेक ठिकाणी वडिलांच्या वयापेक्षा मुलाचे वय जास्त

निवडणूक याद्यांमध्ये एवढे घोळ आहेत, तरीही निवडणुकीला सामोरे कसे जाता?

मतदार याद्यांमधील घोळ दूर होत नाही, तोपर्यंत निवडणुका नकोत.

तुम्ही खरंच निवडणुकीसाठी तयार आहात का?

मतदानासाठी व्हीव्हीपॅटचा वापर करा.. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रश्न 

विधानसभा निवडणुकीपूर्वी बोगस मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. बोगस मतदान निदर्शनास आणून देखील कारवाई झाली नाही.

एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदार आणले आहेत.

अनेक घरं अशी आहे जी अस्तित्वात नाही, पण तिथे मतदार आहे. खोटे मतदार हे लाखांच्या घरात आहेत.

हरकतीला तुम्ही प्रतिसाद देत नाहीत.

विधानसभा निवडणुकीआधी 18 नोव्हेंबर रोजी आम्ही आयोगाला पत्र दिले होते. खोटे मतदार नोंदवले गेले.

महाविकास आघाडीचे कोणते नेते राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटले?

शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी

इतर महत्त्वाच्या बातम्या 

खोक्या भोसलेच्या कुटुंबानंतर आणखी एका महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, बीडमध्ये नेमकं चाललं काय?

 

 

 

 

 

 

 

 

    follow whatsapp