Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील बहीण-भावाला चंदगड पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आणि शनिवारी त्यांना चितळसर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मोहन जोतिबा पवार (वय 26) आणि शामल जोतिबा पवार (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ADVERTISEMENT
आमदार शिवाजी पाटील यांची पोलिसांत धाव
हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे लक्षात आल्यानंतर सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांची ठाणे पोलिसात धाव घेतली. अज्ञात महिलेने अश्लील व्हॉट्सॲप संदेश पाठवत 10 लाखांची मागणी केल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. हनीट्रॅप च्या माध्यमातून आमदाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा : पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलीची बातमी वाचून हर्षा भोगले हळहळले; X वरुन लोकांना महत्त्वाचं आवाहन
आमदारांकडे 10 लाखांची मागणी, अश्लील मेसेजही पाठवले
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, मोहन आणि शामल यांनी आमदार पाटील यांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांना वर्षभर अश्लील मेसेजेस आणि फोटो पाठवले. सुरुवातीला मित्रत्वाचा बहाणा करून संवाद साधला, पण नंतर अनेक तरुणींना अश्लील फोटो पाठवून राजकीय प्रतिमा धोक्यात आणू शकतात, अशी धमकी देत त्यांनी एकूण 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करणार असल्याची धमकीही त्यांनी दिली. काही काळानंतर आमदार पाटील यांनी त्यांना ब्लॉक केले तरीही, या ट्रॅपची हालचाल सुरू राहिली. अखेर गुरुवारी आमदारांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मोहन पवार ने आमदारांच्या सावर्डे येथील कार्यालयाला भेट दिली आणि स्वतःची चूक मान्य करून माफी मागितली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक तपासात शामल पवार याचा सहभाग देखील समोर आला. दोघांनाही चितळसर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
