पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलीची बातमी वाचून हर्षा भोगले हळहळले; X वरुन लोकांना महत्त्वाचं आवाहन

मुंबई तक

Harsha Bhogle on Pigeon feeding : पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलीची बातमी वाचून हर्षा भोगले हळहळले; X वरुन लोकांना महत्त्वाचं आवाहन

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील माजी नगरसेवकीच्या मुलीची बातमी वाचून हर्षा भोगले हळहळले

point

X वरुन लोकांना महत्त्वाचं आवाहन

Harsha Bhogle on Pigeon feeding : क्रिकेट विश्वातील दिग्गज समालोचक हर्षा भोगले क्रिकेट क्षेत्रातील बेधडक मुलाखती घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांचं समालोचन देखील चाहते फार आवडीने ऐकतात. शिवाय त्यांची अनेक पुस्तकं देखील प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या हर्षा भोगले त्यांच्या X पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. पुण्यातील नगरसेवकाच्या मुलीचा कबुतरांच्या विष्ठेमुळे झालेल्या फुफ्फुसांच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची बातमी त्यांनी वाचली. त्यामुळे हर्षा भोगले यांनी ट्वीटरवरुन म्हणजे सध्याच्या X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हळहळ व्यक्त केली. शिवाय, त्यांनी दिल्लीतील लोकांना महत्त्वपूर्व आवाहन देखील केलं.

हेही वाचा : 'पश्चाताप होतोय, तेव्हाच अनंत तरेंचं ऐकलं असतं तर शाहांच्या चरणी लोटांगण घेणारे...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

कबुतरांना खायला टाकणे थांबवू या, हर्षा भोगले यांचं आवाहन 

हर्षा भोगले यांनी  X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, दिल्लीतील मैदानावर जात असताना माझं मन खिन्न झालं, कारण मी पाहिलं की, लोकX कबुतरांच्या संपूर्ण थव्याला खायला टाकत होते. डॉक्टर अनेक वेळा जोर देऊन सांगत आहेत की कबुतरांच्या विष्ठेतील धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास गंभीर फुफ्फुसाच्या आजाराला सामोरं जावं लागू शकतं. कृपया, कबुतरांना खायला टाकणे थांबवू या.

हर्षा भोगले यांनी वाचलेली बातमी काय होती?

पुण्यातील माजी नगरसेवकाची कन्या असलेल्या शितल शिंदे यांना कबुतरांच्या विष्ठमुळे फुफ्फुसाचा आजार झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तीन वर्षे त्या सातत्याने खोकल्याचा त्रास होत होता. डॉक्टरांनी हा त्रास कबुतरांमुळे होत असल्याचं सांगितलं होतं. शेवटच्या काळात तिला सातत्याने ऑक्सिजनची गरज भासत असे. उपचार आणि कुटुंबियांनी सर्वोतपरी प्रयत्न केल्यानंतरही शितल शिंदे यांचा मृत्यू झाला. मुलगी गमावल्यानंतर माजी नगरसेवक असलेल्या वडिलांनी कबुतरांमधून होणाऱ्या संसर्गाबाबत जनजागृती प्रयत्न सुरु केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp