Raj Thackeray, Mumbai : महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (दि.15) पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे काल देखील निवडणूक आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात जात अधिकाऱ्यांना भेटून या शिष्टमंडळाने मतदार यादी संदर्भात काही सवाल केले होते. मात्र, कालची भेट निष्फळ ठरली होती. दरम्यान, आज अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना काही बिनतोड सवाल देखील केले आहेत. राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्या, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रत्नागिरी: गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; प्रवचन सांगणाऱ्या कोकरे महाराजाच्या आवळल्या मुसक्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक
राज ठाकरे म्हणाले, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाहीत? मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करत आहात ? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाहीत. आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. फक्त आठ दिवसांची मुदत देता. निवडणूका कशा लढवायच्या सांगा? क्लिष्ट प्रश्न नाहीत. आमचा मतदारांशी संबंध येतो, तुमचा नाही. ते आम्हाला मतदान करतात. ही पारदर्शकता आहे का? 2022 ला बेसावध राहिलो. सगळं व्यवस्थित केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाहीत. मुलगीचे वय 134 व वडिलांचे 40 कुणी कुणाला जन्म दिला? तुम्हीच सगळे ठरवणार का? निवडणूक आम्ही लढवतो व तुम्ही निवडणूक कंडक्ट करता. राजकीय पक्षांना क्लिअर झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. निवडणूक कार्यक्रम रद्द करा. मतदार याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करुन घेऊ... मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला आम्ही तयार नाही, असं सांगा.
...तर डायरेक्ट election for selection करून टाका- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही हुकूमशाही पाळणार आणि आम्ही लोकशाही पाळणार का? चोक्कलिंगम म्हणतात जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही. आम्ही कोणाशी बोलू? त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता... डायरेक्ट election for selection करून टाका. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही. VVPAT नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या. बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असतील तर लागू देत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
3 एकर जमिनीवर 3 कोटींचं कर्ज दाखवलं, वसुलीसाठी जमिनीचा लिलाव, अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा प्रताप
ADVERTISEMENT
