मोठी बातमी : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार? उद्धव ठाकरेंची साथ सोडणार

मुंबई तक

16 Oct 2025 (अपडेटेड: 16 Oct 2025, 11:27 AM)

Nashik Politics : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार?

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार?

point

नाशकात भाजपचा मोठा डाव

Nashik Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्थानिक नेते मंडळींनी मोठी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, नाशकातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष आपला किल्ला मजबूत करण्याच्या तयारीत असून भाजपने पक्ष वाढीसाठी अनेकांना पक्षात खेचण्यास सुरुवात केली आहे. भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखी एक नेता गळाला लावलाय. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

हे वाचलं का?

भारत कोकाटे ठाकरेंची साथ सोडणार? भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा 

नाशिक जिल्ह्यात भाजपकडून जोरदार संघटनबांधणी सुरू आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत भाजपने स्थानिक स्तरावर मोठे चेहरे आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे सख्खे भाऊ भारत कोकाटे आज भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रवेशामुळे भाजपला नाशिक जिल्ह्यातील समीकरणे आपल्या बाजूने वळवण्याची मोठी संधी मिळणार आहे.

हेही वाचा : बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, राजेसाहेब देशमुखांचा ओबीसी मेळाव्यावरुन धनंजय मुंडेंवर प्रहार; छगन भुजबळांनाही टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारत कोकाटे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सिन्नर तालुक्यातील सोमठाणे ग्रामपंचायतीचे सरपंच असलेले भारत कोकाटे हे नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विशेष कार्यकारी सोसायटी यांसारख्या अनेक संघटनांमध्ये कार्यरत आहेत.

माणिकराव कोकाटे यांच्या कुटुंबातील मतभेदांबद्दल गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यानच त्यांच्या घरातील राजकीय तणाव उघड झाला होता. याच मतभेदांच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सिन्नरमध्ये ठाकरे गटासाठी सक्रिय प्रचार केला आणि उमेदवार राजाभाऊ वाजे यांना चांगलं मतदान मिळालं, असं मानलं जातं.

मात्र आता भारत कोकाटे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने ठाकरे गटालाही जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे. त्याचबरोबर सिन्नर आणि नाशिकमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. भाजपने पुण्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातही अजित पवार गटाला अडचणीत आणण्यासाठी मोठी रणनीती आखली असून, या प्रवेशामुळे भाजपचं “नाशिक मिशन” अधिक गतीमान होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'...नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही', ठाकरेंच्या आमदाराने मंत्री प्रताप सरनाईकांची गाडी अडवून जाब विचारला