Rajesaheb Deshmukh on Dhananjay Munde, बीड : "धनंजय मुंडेंचा तोल गेलेला आहे. त्यांचा मनावर ताबा राहिलेला नाही. त्यांच्या पाठिमागे मराठा समाजाचे माणसं फिरतात. त्यांनी यांचा काय आदर्श घ्यायचा? तुम्ही निष्क्रिय आहेत, म्हणून मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं. शेकडो गुन्हे घडले आणि मर्डर झाले. त्या गुन्हेगारीतून तुम्हाला त्याच्यातून काढलं. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना वाटू लागलंय की, माझ्यामागे कोणीच राहिलं नाही. मग चला ओबीसी म्हणून काहीतरी मतं माडायची, असं सुरु आहे. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना झालाय. ओबीसींचा मेळावा कोणाचा भुजबळ साहेबांचा आहे. त्यांना यांना निमंत्रण तरी दिलंय का? दिलं नाही. त्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं नाही, तिथे तुम्ही जाणार आहात. तिथं तुम्ही टक्क्याची भाषा करता. तुम्ही गुन्हेगार आहेत, म्हणून मंत्रिमंडळातून काढून टाकलं. जो निष्क्रिय आहे, तो जातीवाद करतो. धनंजय मुंडे निष्क्रियतेचा कळस आहे", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुख म्हणाले. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बॉयफ्रेंडला लोक म्हणायचे 'हा तर तुझा मुलगा.. म्हणून मी...' तरूणीने सांगितली 'ती' गोष्ट!
"मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ओबीसींचं राजकारण करा"
राजेसाहेब देशमुख म्हणाले, छगन भुजबळ जो मेळावा घेत आहेत, तो चुकीचा आहे. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीये. मंत्री झाल्यानंतर त्यांचा अशा पद्धतीचा कारभार सुरु आहे. तुम्हाला एवढा जोर असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ओबीसींचं राजकारण करा. राजीनामा दिल्यानंतर किती ओबीसी येतात ते पाहा.. ओबीसी नवीन थोडीच आहेत. महाराष्ट्रात नवीन जाती नाहीत. ओबीसी, मराठा, मागासवर्गीय किंवा मुस्लिम समाज असेल. सर्वजण एकत्रित गुण्यागोविंदाने महाराष्ट्रात राहातात. तुम्ही ओबीसी म्हणून मराठा समाजाला विरोध करत आहात. तुमच्या संपत्तीचा हिशोब देता आला नाही म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला होतात. हजारो कोटींच्या संपत्तीचा हिशोब देता आला नाही, त्यामुळे तुम्ही अडीच वर्ष जेलमध्ये गेलात. भुजबळ साहेबांचे ओबीसी किती गरीब आहेत पाहा.. जेलमधून सुटून आलात. जरा व्यवस्थित काम करा.
पुढे बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले, बोगस मतदान करायचं. बोगस अधिकारी आणायचे. प्रशासन ठेवायचं नाही. बोगस मतांवर निवडून आले. त्यांना बोलायचा अधिकार देखील नाही. कोणत्या मराठा समाजाने तुम्हाला विचारलं आहे, की आमचा टक्का द्या. तुम्ही कोण आहेत? न बोलावता सावरगावच्या मेळाव्याला हजर होतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
