Solapur Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या असताना सोलापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. सोलापुरातील चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने आणि मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांचा समावेश आहे. दरम्यान, माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे अमेरिकेत उपचार घेत असले तरी त्यांचे पुत्र रणजित शिंदे भारतात आहेत. तीन माजी आमदार आणि बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सोलापूरच्या राजकारणात पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
बबन शिंदे माढ्यातून 6 वेळा निवडून आलेले आमदार
बबनदादा शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. ते माढ्यातून सहा वेळा निवडून आले. मात्र, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होते. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी त्यांच्या मुलाला अपक्ष उभा करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या बबनदादा शिंदेंवर अमेरिकेत उपचार सुरु आहेत. मात्र, सध्या त्यांचे पुत्र भारतात असून त्यांची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाल्याची चर्चा आहे. बबनदादा शिंदेंचं माढ्याचे राजकारणात मोठं वर्चस्व आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अभिजीत पाटील यांनी रणजीत शिंदे यांचा जवळपास तीस हजार मतांनी पराभव केला होता.
मोहोळचे 2 माजी आमदार भाजपात जाण्याची शक्यता
राजन पाटील हे मोहोळचे माजी आमदार आहेत. मोहोळच्या राजकारणात त्यांचं वर्चस्व आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मोहोळ मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर राजन पाटील यांची इच्छा असेल तोच आमदार होईल, असं बोललं जात होतं. मात्र, यंदा त्यांचे विश्वासू सहकारी असलेल्या यशवंत माने यांना देखील पराभव झाला. मोहोळच्या लोकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे यांना आमदार म्हणून निवडून दिलं. त्यानंतर मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि राजन पाटील दोघेही भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.
दिलीप मानेंनीही भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला?
शिवाय दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहेत. दिलीप माने 2 वेळेस दक्षिण सोलापुरातून निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळेल असे बोलले जात होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर ते भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
