K. C. Tyagi on Eknath Shinde : "शिंदे हे मालकाचं नाव नाही. मालकाच्या घरातून सामान उचलून नेणाऱ्याचं नाव शिंदे आहे. नितीश कुमार मालक आहेत, त्यांनी घाम गाळून हा पक्ष उभा केलाय", असं जनता दलाचे (संयुक्त) नेते केसी त्यागी यांनी म्हटलंय. ते वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जालना महापालिकेचा आयुक्त 10 लाखांची लाच घेताना सापडला, कंत्राटदारांचा आनंद गगनात मावेना; फटक्यांची माळ उडवली
नितीश कुमारांची तुलना एकनाथ शिंदेंनी करु नका - केसी त्यागी
केसी त्यागी म्हणाले, "नितीश कुमार म्हणजे एकनाथ शिंदे नाहीत. नेतृत्वाच्या विरोधात बंडखोरी करुन काहीतरी मिळवणारे नेते आहेत. नितीश कुमार यांनी सुरुवातील आरजेडीविरोधात लढा दिला. त्यानंतर ते त्याठिकाणी पोहोचले आहेत. त्यांनी राजकारणात संघर्ष केलाय. नितीश यांनी शौर्य आणि पराक्रमाने राष्ट्रीय जनता दलाशी लढून आजचे स्थान मिळवले आहे. 1995 मध्ये जेव्हा ते मुख्य पक्षापासून वेगळे झाले तेव्हा ते संपले असे सगळेच म्हणत होते. माझी विनंती आहे, त्यांची शिंदेंशी तुलना करु नका. शिंदे हे मालकाचं नाव नाही. मालकाच्या घरातून सामान उचलून नेणाऱ्याचं नाव शिंदे आहे. नितीश कुमार मालक आहेत, त्यांनी घाम गाळून हा पक्ष उभा केलाय.
हेही वाचा : बबन शिंदे,राजन पाटलांसह आणखी 2 माजी आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा, सोलापुरात मोठ्या घडामोडी
संजय राऊतांनाही साधला निशाणा
दरम्यान, केसी त्यागी यांनी शिंदेंवर टीका केल्यानंतर हा व्हिडीओ संजय राऊत यांनी शेअर केलाय. यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, केसी त्यागी यांनी शिंदे किंवा अजित पवार यांचे नेमके वर्णन मोजक्या शब्दात केले आहे. एक मारा लेकिन सॉलिड मारा! “शिंदे कोण? मालकाच्या घरातील सामान चोरून नेणारे नेते!”
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
