Deepak Aaba Salunkhe likely to join bjp : सोलापुरात भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही धक्का दिलाय. कारण सोलापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दीपक आबा साळुंखे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुराती बडे नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. दीपक आबा साळुंखे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेते आले होते. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणुकीत दीपक आबा साळुंखेंचा पराभव
दीपक आबा साळुंखे सांगोला तालुक्यातील महत्त्वाचे नेते मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानपरिषदेचे आमदार देखील झाले होते. बरेच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले दीपक आबा साळुंखे 2024 ची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले होते. सांगोल्यातून त्यांनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते.
हेही वाचा : ATS चा अधिकारी असल्याचं सांगून 70 वर्षीय वृद्धाकडून 1.44 कोटी उकळले, पुण्यातील डिजिटल अरेस्टचं मोठं प्रकरण
सांगोला विधानसभा निवडणूक 2024 कोणाला किती मतं पडली?
बाबासाहेब देशमुख - 116256 मतं - (25386 मतांनी विजयी)
शहाजीबापू पाटील - 90870 मतं
दीपक आबा साळुंखे - 50962 मतं
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 माजी आमदारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे काँग्रेसचे नेते दिलीप माने यांनी देखील भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे धक्के बसलाय. शिवाय, आता ठाकरेंचे नेते दीपक साळुंखे देखील भाजपमध्ये जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस अजित पवारांवर कुरघोडी करत असल्याचे बोलले जात आहे.
सोलापुरातून भाजपमध्ये प्रवेश करणार असणारे नेते कोण?
राजन पाटील - मोहोळ - अजित पवारांची राष्ट्रवादी
यशवंत माने - मोहोळ - अजित पवारांची राष्ट्रवादी
दिलीप माने - दक्षिण सोलापूर - काँग्रेस
बबन शिंदे - माढा - अजित पवारांची राष्ट्रवादी
दीपक साळुंखे - सांगोला - ठाकरेंची शिवसेना
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
