Maharashtra Politics : गेल्या दोन दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची डिफेंडर कार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. बुलढाण्यातील भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी कसल्या कमिशनमधून हे कार खरेदी केली? असा सवाल केल्यानंतर संजय गायकवाड संतापले आहेत. संजय गायकवाड यांनी विजय शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
दीड कोटींची कार गिफ्ट, कमिशनच्या पैशातून घेतल्याचा भाजपचा आरोप
एकनाथ शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांची दिवाळी जोमात सुरु आहे. कारण संजय गायकडवाडांना तब्बल दीड कोटी रुपयांची कार त्यांना गिफ्ट मिळाली. त्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. संजय गायकवाडांचा या कारसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. भाजपने ही कार कंत्राटदाराकडून घेतलेल्या पैशातून घेतल्याचा आरोप केलाय.
भाजप नेते विजय शिंदे म्हणाले, मी दीड कोटीची डिफेंडर आणल्याचे बोलले गेले. ती डिफेंडर अजून तरी मला माहिती नाही कुठे आहे? मात्र, आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे. एका कंत्राटदाराच्या नावावर ही कार आलेली आहे. आज दाखल झालीये. ती डिफेंडर कोणा आहे? आणि कोणत्या कंत्राटदाराकडून कमिशन म्हणून मिळाली आहे? याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, एवढा मोठा हा विषय नाही. त्यांच्यामागे महाराष्ट्राचे काम आहेत. हे तर इथला पीआय पण करु शकतो.
संजय गायकवाड काय म्हणाले?
ज्याने माझ्यावर आरोप केले आहेत? त्याने कशा पद्धतीने पैसे कमावले हे सांगायची गरज नाहीये. मी त्याला काही उत्तर देत नाही. पण ज्याने ही गाडी मला दिली, तो कंत्राटदारा होण्याच्या आधी माझा नातेवाईक आहे. माझ्या पक्षाचा कार्यकर्ता देखील आहे. दीड कोटी रुपयांचं कर्ज त्याने त्यासाठी काढलेलं आहे. पहिली गाडी विकून त्याने डाऊन पेमेंट भरुन ही कार आणली आहे. 100 टक्के कर्जावर असलेली त्याची ही कार आहे. यात काय चर्चा करायचा किंवा आरोप करण्याचा विषय आहे? MLA चे सिम्बॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी गाडीवर टाकलेले आहेत. त्याने डिफेंडर कार आणल्यानंतर मी म्हटलं मला पाहूदे जरा वापरुन.. तेवढ्याकरता सिम्बॉल आहे त्याच्यावर.. सगळ्या गाड्या सारख्याच आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
