पैठणच्या आमदाराने बाहेरुन मतदार आणल्याचं सांगितलं, शिंदेंनी डोळा मारुन दाढीवरुन हात फिरवला, राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray on Eknath Shinde : पैठणच्या आमदाराने बाहेरुन मतदार आणल्याचं सांगितलं, शिंदेंनी डोळा मारुन दाढीवरुन हात फिरवला, राज ठाकरेंचा हल्लाबोल

Mumbai Tak

मुंबई तक

19 Oct 2025 (अपडेटेड: 19 Oct 2025, 01:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पैठणच्या आमदाराने बाहेरुन मतदार आणल्याचं सांगितलं

point

शिंदेंनी डोळा मारुन दाढीवरुन हात फिरवला, राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray on Eknath Shinde, Mumbai : "यांची हिंमत कुठपर्यंत गेली आहे पाहा. सत्ताधारी पक्षातील आमदार सांगतो की, माझ्या मतदारसंघात मी 20 हजार मतदार बाहेरुन आणले. जाहीररित्या भाषणात बोलतो. पैठणचे  भूमरे म्हणून आमदार आहेत. त्यादिवशी त्यांनी भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी हे सांगितलं. त्यानंतर शिंदेंनी डोळा मारला किंवा दाढीवरुन हात फिरवून सांगितलं. मग लगेच तो आमदार म्हणाले, नाही नाही जे बाहेर गेले होते. स्थलांतरीत होते, त्यांना मी आणलं", असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदेंचे पैठणचे आमदार भुमरे यांचा व्हिडीओ भर सभेत दाखवला. मुंबईत मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासह सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांचा लाव रे तो व्हिडीओचा प्रयोग पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिंदेंचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचेही व्हिडीओ यावेळी राज ठाकरेंनी दाखवले. 

हे वाचलं का?

हेही वाचा : जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप, मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच समोर, गोखलेंसोबतच्या भागिदारीवरुन सविस्तर भाष्य

सत्ताधारी पक्ष मतदार याद्यांमध्येच फेरफार करत आहेत, राज ठाकरेंचा आरोप 

राज ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होते, पण मत मात्र मिळत नाहीत, असा सत्ताधाऱ्यांचा आरोप असतो. त्यांच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नाही, असंही टीकाकार म्हणतात. मात्र, जर निवडणुका बोगस मतदार घुसवून घेतल्या जात असतील, तर आमचे आमदार-खासदार कसे निवडून येणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्ष मतदार याद्यांमध्येच फेरफार करत आहेत. मग तुम्ही मतदान करा किंवा करू नका, त्याचा काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे जनतेच्या मताला किंमतच राहत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगावर बोललो की सत्ताधारी चिडतात. आम्ही केलेले आरोप खरे असल्यामुळेच त्यांना राग येतो. तुम्हाला राग येतोय कारण तुम्हीच गैरप्रकार केले आहेत. प्रत्येकाला ठाऊक आहे की सत्ता कशी आली आणि राजकारण कसं सुरू आहे.”

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तब्बल 232 आमदार निवडून आले, पण इतकं मोठं यश मिळूनही राज्यात कुठेही उत्सव, मिरवणुका किंवा जल्लोष दिसला नाही. मतदारसुद्धा निकाल पाहून आश्चर्यचकित झाले. निवडून आलेल्यांनाही समजलं नाही की ते कसे जिंकले. बोगस मतदारांच्या सहाय्याने सत्ताधारी स्थानिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हानही त्यांनी निवडणूक आयोगास दिले.

MNS Melava LIVE : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत निवडणुकांवरुन मेळावा

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

राज ठाकरेंकडून पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', पीएम मोदी अन् शिंदेंच्या आमदारांचे व्हिडीओ दाखवले, निवडणूक आयोगाला घेरलं

    follow whatsapp