मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपने उमेदवार ठरवला, 'या' नगरसेविकेला दिली संधी!

Ritu Tawade : रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्या तीन वेळेस नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. 2026 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून त्यांनी विजय मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. महापौरपदाच्या शर्यतीत त्या सुरुवातीपासूनच प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

Ritu Tawade was new mayor of mumbai bmc bjp announce mahapaur candidate name sanjay ghadi deputy mayor from shiv sena Maharashtra Politics Marathi News

BJP Mayor

मुंबई तक

07 Feb 2026 (अपडेटेड: 07 Feb 2026, 01:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून कोणाला संधी?

point

उपमहापौर म्हणून शिंदेसेनेच्या संजय घाडी यांची निवड होणार

Ritu Tawade, Mumbai Mahapalika Mayor : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून आता अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. त्याचवेळी उपमहापौरपदासाठी शिंदेसेना (शिंदे गट) कडून देखील नाव जाहीर करण्यात आलं आहे. याचा अर्थ मुंबईत भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे. हे आता निश्चित झालं आहे. पुढील सव्वा वर्षांचा कार्यकाळ शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे. भाजपकडून महापौरपदासाठी दोन महिला नगरसेविकेंच्या नावावर जोरदार चर्चा सुरू होती. त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

अखेर भाजपकडून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. त्याचवेळी उपमहापौरपदासाठी शिंदेसेना (शिंदे गट) कडून संजय शंकर घाडी यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. पुढील सव्वा वर्षांचा कार्यकाळ संजय घाडी उपमहापौर म्हणून भूषवणार आहेत. भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे आणि शीतल गंभीर या दोन्ही नावांची जोरदार चर्चा होती. मात्र अखेरीस रितू तावडे यांनी बाजी मारली.

हेही वाचा : जालना हादरलं, भर चौकात तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करुन खून; शहरात खळबळ

कोण आहेत रितू तावडे?

रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्या तीन वेळेस नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. 2026 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून त्यांनी विजय मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. महापौरपदाच्या शर्यतीत त्या सुरुवातीपासूनच प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

रितू तावडे या मुंबईतील सक्रिय आणि अनुभवी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी एस.वाय.बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले असून मे. आर.आर. इंटरप्राईजेस या व्यवसायाशी त्या संबंधित आहेत. त्या हिंदू-मराठा समाजातील असून  त्यांचे पती राजेश मधुकर तावडे हे व्यावसायिक आहेत. त्यांना दोन मुले असून मुलगी अॅडव्होकेट मधुरा राजेश तावडे, तर मुलगा यश राजेश तावडे हा कम्प्युटर इंजिनीयर (बी.ई.) आहे.

राजकीय क्षेत्रात रितू तावडे यांचा प्रदीर्घ आणि बहुआयामी अनुभव आहे. त्यांनी मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा तसेच ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका राहिल्या असून शिक्षण समितीच्या अध्यक्षा आणि मुंबई उपनगरातील स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले आहे. याशिवाय त्या महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालिका तसेच भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग अंतर्गत प्रोफेशनल ट्रेनिंग असोसिएटच्या सदस्य आहेत.

सामाजिक क्षेत्रातही रितू तावडे यांचे योगदान लक्षणीय आहे. त्या सहारा जनरल कामगार कर्मचारी संघटनेच्या संस्थापक, मराठा प्रतिष्ठा (नोंदणीकृत) महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, तसेच स्वामिनी महिला सेवा सहकारी संस्था मर्यादितच्या अध्यक्षा आहेत. यासोबतच मे. कॉमन सर्विस सेंटर, घाटकोपर या संस्थेच्या त्या संचालिका आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर त्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहिल्या आहेत.
 

उपमहापौरपदी संजय घाडींच्या नावाची घोषणा

मुंबई मनपाच्या उपमहापौरपदासाठी शिंदेसेना (शिंदे गट) कडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाने मुंबईतही पद वाटपातील आपला पायंडा कायम ठेवत ही जबाबदारी संजय घाडी यांच्याकडे सोपवली आहे. सव्वा वर्षांचा कार्यकाळ उपमहापौर म्हणून राहील, याबाबतची माहिती शिवसेनेच्या कार्यालयाकडून परिपत्रक काढून करण्यात आली आहे. 

    follow whatsapp